हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज म्हणजेच 13 मार्च 2022 रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत 10 रुपयांनी किरकोळ वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 48,400 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,800 रुपये आहे . तर 1 किलो चांदीच्या दरात 4,400 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर त्याची किंमत 74,700 रुपये झाली आहे.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार सोन्याचे दर
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52800 रुपये
पुणे–
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52850 रुपये
नागपूर-
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52880 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणपणे नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.