कमवा शिका योजनेचे मानधन वाढवा, अन्यथा तीव्र आंदोलन-अभाविप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून शिक्षण घेण्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी येत असतात. त्यामध्ये ग्रामीण भागातून येणारा होतकरू विद्यार्थी कामवा व शिका योजनेच्या माध्यमातून काम करून आपले शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. या योजनेच्या माध्यमातून अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना 45 रुपये प्रति तास मानधन देण्यात येते. हे मानधन 2017 पासून देण्यात येत असून यामध्ये कुठल्याही पद्धतीची वाढ आजवर झाली नाही.

एकीकडे विद्यापीठातील भोजनाचे दर वाढले, प्रवेश व परीक्षा फी मध्ये वाढ झाली, अनेक शुल्क वाढ झाली असता विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या कमवा व शिका योजनेच्या मानधनात मात्र कुठल्याही प्रकारची वाढ का केली नाही ? किंमती वाढत आहेत, त्याप्रमाणे विद्यार्थ्याना मिळणारे मानधन पण वाढायला हवे, इतक्या कमी मोबदल्यात मेस व वाढलेले शुल्क भरणे शक्यच नाही, गरीब विद्यार्थ्यांनी कुठे जायचे असा सवाल अनिल शास्त्री या विद्यार्थ्याने अभाविप पुणे विद्यापीठ उपस्थित केला.

अनेक विद्यार्थी या योजनेमध्ये काम करतात, मात्र कमी मानधनामुळे शिक्षणाच्या आवश्यक गरजा पूर्ण होत नाही, या सर्व बाबींचा विचार करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे विद्यापीठ अध्यक्ष महादेव रंगा द्वारे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मानधनात प्रती तास १० रुपये वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांना या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल व प्रशासन योग्य तो निर्णय घेईल असे आश्वासन दिले. विद्यापीठाने सर्वच शुल्कामध्ये वाढ केली असता कामाच्या मानधनांमध्ये सुद्धा वाढ करणे गरजेचे आहे, जर विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ झाली नाही तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा विद्यापीठ अध्यक्ष महादेव रंगा यांनी दिला.

आपला
विद्यापीठ अध्यक्ष ????
महादेव रंगा
8999080809

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता