Independence Day 2023 : भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा नेमका इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिवस (Independence Day 2023) . या दिवशी भारत इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला आणि त्याने स्वतःचे एक वेगळे स्वातंत्र्य राज्य प्रस्थापित केले. 200 हजार वर्षांहून अधिक ब्रिटीश सत्तेचा अंत म्हणून साजरी करण्यात येणारा दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट. परंतु स्वातंत्र्य पूर्वीचा भारत खूप वेगळा आणि एक वेगळा अनुभव देणारा होता. देशातील अनेक संघटना, नेते, क्रांतिकारकांनी या स्वातंत्र्यलढ्याच्या उठावात महत्वाची भूमिका बजावली आहे. ‘भारत छोडो आंदोलन’ यातले एक मुख्य आंदोलन होते जे ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या विरोधात पुकारण्यात आले होते. या आंदोलनाने ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून भारतासाठी मुक्तीचे दार उघडले. भारताला  स्वातंत्र्य मिळण्यामागे या आंदोलनाचा महत्वाचा वाटा आहे.

स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात कधी झाली –

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा हेतूच ब्रिटिश राजवट संपवण्याचा होता. हा लढा १८५७ ते १९४७ काळात झाला. २६ जानेवारी १९३० रोजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली होती. सर्वात पहिल्यांदा या स्वातंत्र्यलढ्याचा उठाव बंगाल येथे झाला होता. येथे झालेल्या उठावानेच भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा पाया मजबूत केला. 1920 च्या शतकात स्वातंत्र्यलढ्याच्या (Independence Day 2023) शेवटच्या टप्प्यात राष्ट्रीय काँग्रेसने महात्मा गांधी यांच्या अहिंसेचा अवलंब करत स्वातंत्र्य लढ्यात आपले पाय रोगले. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर, सुब्रमण्यम भारती आणि बंकिमचंद्र चटोपाध्याय यांसारख्या अनेक देशभक्तांनी या स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळे वळण दिले. या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू, प्रीतिलता वड्डेदार आणि कस्तुरबा गांधी यांसारख्या महिलांनी देखील आपली कंबर कसून सहभाग नोंदवला.

वेगेवेगळ्या चळवळींमुळे बळ मिळालं – (Independence Day 2023)

ब्रिटिशांकडून भारतीयांवर जे अन्याय करण्यात आले त्याची परतफेड म्हणून भारतीयांनी देखील ब्रिटिशांविरोधात बंड पुकारण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या चळवळी उभा राहू लागल्या. या चळवळींनी लोकांना बळ दिले. स्वातंत्र्य हे ब्रिटिशांनी दिलेली देन नाही तर भारतीयांना मिळालेला जन्मता अधिकार आहे ही गोष्ट क्रांतिवीरांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना बंडावून सांगितली. यातील काही क्रांतिकार्यांना म्हणजेच राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांना या लढ्यात आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीने येथील वैचारिक विचारांची पातळी उंचावण्यास मदत केली. भारत हा कुणाचाही हुकमावर चालणारा नसून तो धर्मनिरपेक्षता, लोकशाही, प्रजासत्ताक मार्गावर चालणारा देश आहे ही बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पटवून दिली. १९३० नंतरच्या स्वतंत्र लढ्याने आंदोलनाने समाजवादी प्रवृत्ती स्वीकारली. इ.स.१९४२ साली तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ब्रिटिशांकडे भारताच्या स्वातंत्र्याची जोरदार मागणी करायला सुरुवात केली. छोडो भारत असे या आंदोलनाचे नाव होते. यामध्ये संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणावर उत्सफूरतपणे लोकांनी सहभाग नोंदविला. अखेर १९४७ साली ब्रिटिशांनी नमते घेतले. परंतु गव्हर्नर माउंटबॅटन यांनी भारत आणि पाकिस्तान अशी भारताची फाळणी केली. १४ ऑगस्ट १९४७ ला पाकिस्तान आणि १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वातंत्र्य (Independence Day 2023) मिळालं. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्याच्यासमोर अनेक वेगवेगळी आव्हाने होते. या सर्व आव्हानांना सामोरे जाण्याचे काम भारतातील समाजसुधारकांनी राजकीय नेत्यांनी तसेच येथील नागरिकांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात, जवाहरलाल नेहरू , वल्लभभाई पटेल , अब्दुल गफार खान , मौलाना आझाद आणि इतर होते. रवींद्रनाथ टागोर , सुब्रमण्यम भारती आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांसारख्या विचारवंतांनी, तसेच, राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर यांसारख्या क्रांतिकाऱ्यांनी सर्वात महत्त्वाचे म्हणजे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक , सुभाष चंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, विनोदा भावे, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद यांसारख्या अनेकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज भारत स्वातंत्र्य होण्यामागे या सर्व देशभक्तांचा सर्वात मोठा वाटा आहे.