हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काश्मीर संदर्भात केलेल्या विधानावरुन भारताने तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगान यांना खडे बोल सुनावले आहेत. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून त्यात तुर्कस्तानने हस्तक्षेप करू नये असं भारताकडून सांगण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, ”जम्मू-काश्मीर संदर्भात टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेले सर्व संदर्भ भारत नाकारत असून जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे जो कधीही भारतापासून वेगळा होऊ शकत नाही.”
एर्दोगान यांनी शुक्रवारी पाकिस्तानी संसदेमध्ये दिलेल्या भाषणात ”काश्मिरींच्या संघर्षाची तुलना पहिल्या महायुद्धात तुर्कस्तानने दिलेल्या परदेशी राजवटीविरूद्धच्या लढाईशी केली. एर्दोगान यांच्या विधाना संदर्भात कुमार म्हणाले, “आम्ही तुर्कस्तानच्या नेतृत्त्वाला विनंती करतो की त्यांनी भारताच्या अंतर्गत मुद्य्यांमध्ये हस्तक्षेप करू नये. त्याचबरोबर पाकिस्तान उत्पन्न दहशतवादाचा भारत तसेच अन्य क्षेत्राला गंभीर धोका निर्माण झाला आहे याबतीतील आपली समज वाढवावी. ”
भारताने घेतलेल्या आक्षेपानंतर सुद्धा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत म्हटलं कि, ” पाकिस्तानच्या काश्मीरबाबत भूमिकेचे तुर्कस्तान समर्थन करेल कारण हा दोन्ही देशांशी जोडलेला विषय आहे. दोन दिवसांच्या पाकिस्तान दौर्यावर दाखल झालेल्या राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी पाकिस्तानच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनात भाषण करताना जाहीर केले की, या आठवड्यात पॅरिसमधील फायनान्शियल अक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) ग्रे लिस्टमधून पाकिस्तानला बाहेर पडण्याच्या प्रयत्नांना तुर्की पाठिंबा देईल.
एफएटीएफच्या आगामी बैठकीच्या संदर्भात ते म्हणाले, “एफएटीएफ बैठकीत राजकीय दबावाच्या संदर्भात आम्ही पाकिस्तानला पाठिंबा देऊ. काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानच्या भूमिकेसाठी आपल्या देशाच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार करीत एर्दोगान म्हणाले की, ”काश्मीरचा मुद्दा संघर्ष किंवा दडपशाहीच्या सोडविता येणार नाही तर न्याय आणि निष्पक्षतेच्या आधारवर त्याला सोडवाव लागेल.”
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.