हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या नागपूर येथील पहिल्या कसोटी सामन्याय भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. 5 दिवसांच्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी भारताने ऑस्ट्रेलिया वर मात केली आहे. 1 डाव आणि 132 धावा राखून भारतीय संघाने कांगारूंचा दारुण पराभव केला आहे.
कर्णधार रोहित शर्माचे शतक आणि भारतीय फिरकीपटूंची जादू हे या पहिल्या कसोटी सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात अवघ्या 177 धावा केल्यांनतर भारतीय संघाने 400 धावांचा डोंगर उभा केला. मात्र ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुद्धा अवघ्या 91 धावात आटोपला. भारताचा स्टार फिरकीपटू रवी अश्विनने दुसऱ्या डावात 5 बळी घेत कांगारूंना आपल्या फिरकीपुढे नाचवले. अश्विन व्यतिरिक्त रवींद्र जडेजा- मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 तर अक्षर पटेलने 1 बळी घेतला.
Nagpur Test, Day 3: India beat Australia by an inning and 132 runs; lead four-match series by 1-0 pic.twitter.com/UZbVaCPA3H
— ANI (@ANI) February 11, 2023
अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला त्याच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पहिल्या कसोटी सामन्यातील विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.