हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीमावर्ती भागात चीन नेहमीच आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला उत्तर म्हणून भारतीय सैन्याने लडाखमध्ये अतिरिक्त तुकडया तैनात केल्या आहेत. येथील सीमावाद कायम असलेल्या पूर्व लडाखच्या काही भागांमध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सैन्याच्या अतिरिक्त तुकडया तैनात केलेल्या आहेत. ५-६ मे रोजी पॅनगॉंग टीएसओ सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक उडाली होती. या आधी सुद्धा या भागामध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये अनेक वेळा चकमकी झाल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाकडून या संबधीची बातमी देण्यात आलेली आहे.
डेमचॉक, चुमार, दौलत बेग ओल्डी आणि गालवान व्हॅली या भागामध्ये सैन्याच्या अतिरिक्त तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. गालवान व्हॅली या भागातही आता चीनकडून आव्हान देण्यात येत आहे. गालवान नदीजवळ चिनी सैन्याने तंबू उभारुन बांधकाम सुरु केले होते. त्याला भारतीय सैन्याकडून आव्हान देण्यात आले असे भारतीय लष्करातील सूत्रांनी सांगितले.
पॅनगॉँग टीएसओ सेक्टरमध्ये ५-६ मे रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हाणामारी झाली होती. त्यावेळी दोन्ही बाजूचे अनेक सैनिक घायाळ झालेले होते. त्यामुळे तेथे अतिरिक्त तुकडया तैनात करण्यात आलेल्या आहेत. २०१३ साली देखील एप्रिल-मे महिन्यात डीबीओ सेक्टरमध्ये भारत आणि चीनचे सैन्य समोरा-समोर आले होते. त्यावेळी तब्ब्ल २१ दिवस या दोन्ही देशांचे सैनिक परस्परासमोर उभे ठाकले होते. चीनने यावेळी भारताच्या हद्दीत सुमारे १९ किलोमीटर आतपर्यंत घुसखोरी केल्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. २०१८ साली डेमचॉकमध्ये सुद्धा तंबू ठोकण्यासाठी चीनचे सैन्य ३०० ते ४०० मीटर आत आले होते. मात्र त्यावेळी सुद्धा भारतीय सैन्याने त्यांना आव्हान दिऊन माघारी पिटाळण्यात यश मिळवले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.