India-China Standoff : LAC वर आपल्या सैनिकांसाठी चीन बांधत आहे मॉड्यूलर आर्मी शेल्टर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीजिंग । पूर्व लडाखमधील भारत आणि चीनमधील तणाव अजूनही पूर्णपणे संपलेला दिसत नाही. भारतासोबत डझनहून अधिक बैठकांनंतरही चीनची चाल बदलली नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला (LAC) लगतच्या भागात अशांतता वाढवण्याच्या रणनीतीवर चीन पुन्हा एकदा काम करत आहे. ताज्या गुप्तचर अहवालातून असे दिसून आले आहे की, पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) किमान 8 पुढील ठिकाणी आपल्या सैनिकांसाठी नवीन मॉड्यूलर कंटेनर-आधारित शेल्टर (Modular Army Shelter) बांधत आहे.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, नव्याने बांधण्यात आलेल्या लष्कराचे शेल्टर्स उत्तरेतील काराकोरम खिंडीजवळील वहाब झिल्गापासून पियू, हॉट स्प्रिंग्स, चांग ला, ताशीगॉन्ग, मांझा आणि चुरूप पर्यंत पसरले आहेत. हे LAC ला लागून असलेल्या भागात दक्षिणेकडे जाते. रिपोर्टनुसार एका सूत्राने सांगितले की, “प्रत्येक ठिकाणी सात क्लस्टरमध्ये 80 ते 84 कंटेनरची व्यवस्था आहे. हे नवीन शेल्टर्स PLA ने गेल्या वर्षी एप्रिल-मे मध्ये लष्करी संघर्षानंतर बांधलेल्या अशा अनेक शेल्टर्सच्या व्यतिरिक्त आहेत, जे स्पष्टपणे दर्शवते की, भविष्यात चीनचा या आघाडीवरुन सैन्य मागे घेण्याचा कोणताही हेतू नाही.”

रिपोर्टनुसार, भारत आणि चीन या दोन्ही देशांनी पूर्व लद्दाखमधील LAC जवळ हॉविट्झर्स, टँक्स आणि जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या मिसाईल सिस्टिमसह सुमारे 50,000 सैनिक तैनात केले आहेत. या दोन देशांमधील अस्वस्थ शांततेच्या दरम्यान, दोन्ही बाजूंचे सैन्य जास्त उंचीवर, दुर्गम आणि ऑक्सिजनच्या कमतरता असलेल्या भागात फिरत आहेत. याशिवाय एकमेकांवर नजर ठेवण्यासाठी विमान आणि ड्रोन तैनात केले जात आहेत.

30488 किमी लांब LAC बाबत वाद
3 हजार 488 किलोमीटर लांबीच्या LAC बाबत भारत आणि चीनमध्ये वाद आहे. चीन अरुणाचलचा तिबेटचा भाग असल्याचा दावा करतो तर भारताने स्पष्ट केले आहे की, कोणीही एक इंचही जमीनीवर घुसखोरी करू शकत नाही. तालिबानच्या समर्थनासाठी उभ्या असलेल्या चीनला जगभरात विरोधाचा सामना करावा लागत आहे. क्वाडपासून दक्षिण चीन समुद्र आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशापर्यंत, चीनच्या दादागिरीविरोधातील शिबिराने जिनपिंगच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

या क्षेत्रांबाबत वाद आहे
भारत आणि चीन यांच्यात प्रामुख्याने पांगोंग लेक, गोगरा हाइट्स आणि हॉटस्प्रिंग क्षेत्राच्या काठाबाबत वाद आहे. जरी भारत शांततेने तोडगा काढण्यावर भर देत असला तरी जर चीनने आपली दुहेरी भूमिका थांबवली नाही तर भारतीय सैनिक त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास तयार आहेत.

भारत चीनच्या या दुहेरी स्वभावाला विरोध करत आहे. भारताने नेहमीच हे प्रकरण शांततेने सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु भारताच्या या स्वभावाला कमकुवत मानण्याची चीन सतत चूक करत आहे. अनेक प्रसंगी भारताने चिनी सैनिकांना मागे ढकलले आहे.

Leave a Comment