नवी दिल्ली | करोना विरोधात लढताना सुरवातीला भारताकडे काहीच नव्हते. PPE किटपासून ते इतर आवश्यक गोष्टीही देशाकडे नव्हत्या. पण आतापर्यंत आपण खूप कष्टाने पुढे आलो आहोत. आज आपल्याकडे जवळपास सर्व सामग्री असून आणि त्यातून आपण रुग्णांचे प्राण वाचवत आहोत. डॉक्टर्स मोठ्या हिमतीने काम करत आहेत. तसेच जगातील सर्वात स्वस्त लस ही भारतात आपण विकसित केली आहे. असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करताना म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशांच्या तरुणांना आवाहन केले की, आपापल्या विभागात संरक्षण भिंत बनून काम करावे. असे केल्याने कोणत्याही लॉकडाऊनची गरज पडणार नाही. लहान मुलांनीही बाहेर पडणे टाळावे. सोबतच, वेगवेगळ्या मजूरांनी आहेत तिथेच राहून लस घ्यावी आणि आपले काम चालू ठेवावे. मजुरांची संबंधित राज्य काळजी घेतील यामुळे त्यांनी काही काळजी करू नये.
आताच्या परिस्थितीत देशाला लॉकडाऊन पासून वाचवायचे आहे. प्रधानमंत्रीनी राज्यांनाही विनंती केली की, कोणीही लॉकडाऊन लावू नये. लॉकडाऊनला शेवटचा पर्याय म्हणून पहावे. केवळ गरजेच्या कामासाठी बाहेर पडावे. आणि करोनाशी लढणाऱ्या लोकांना सहाय्य करावे. असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जनतेला केले.