नुसतं सीमेवरच नाही, तर आतील भागातही सैन्य कमी करा; भारताची चीनला मागणी, अन्यथा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाख मधील रस्तेबांधणी वरून चीनने सुरु केलेला सीमावाद आता चीनच्याच अंगलट आला आहे. भारताने आता एक नवा डाव टाकला आहे. ६ जून रोजी झालेल्या चुशुल-मोल्दो मध्ये झालेल्या बैठकीत भारताने ५ महत्वाचे मुद्दे ठेवल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले आहे. यामध्ये भारताने केवळ सीमारेषेवरील नाही तर सीमाभागातील सैन्यही कमी करण्याची मागणी केली आहे. साधारण महिनाभरापासून भारत चीन सीमेवर हा वाद सुरु आहे.  

भारताने चीनला सीमारेषेवर तणावाचा नेमका मुद्दा काय आहे? तसेच वास्तविक सीमारेषेची हद्द काय आहे? त्या जमिनीवर त्यांची हद्द काय असेल? हे कायदेशीर रित्या सांगण्यास सांगितले आहे. यामुळे भविष्यात या विषयावरून चीन वाद करू शकणार नाही. त्याबरोबर ज्यापद्धतीने चीनने या तणावाची सुरुवात केली होती. त्याप्रमाणे चीननेच सर्वप्रथम माघार घेतली पाहिजे असे म्हणणे भारताने समोर ठेवले आहे. चीनच्या सैनिकांनी आधी तंबू लावले होते. त्यामुळे त्यांनीच आधी ते काढावेत अशी मागणी भारताने केली आहे. तसेच केवळ वास्तविक नियंत्रण रेषेवरून नाही तर सीमाभागातून सैन्य मागे जाईल असे भारताकडून सांगण्यात आले. जर चीनने असे नाही केले तर चर्चेचे वातावरण बिघडेल असेही सांगण्यात आले. 

भारताकडून सांगण्यात आले की, जर चीनला सीमेवरचा तणाव कमी करायचा आहे तर त्यांच्या सैनिकांना मागे जावे लागेल. म्हणजे आता मागे जायचे की तिथेच थांबायचे हे चीनच्या हातात आहे.  अर्थात सीमेवरील तणाव वाढविणे किंवा संपवणे भारताने चीनवर सोपविले आहे. तसेच चीनने रस्ते बांधले तर भारताने बांधल्यावर चीनला काय समस्या आहे? हा मुद्दाही मांडण्यात आला. त्याबरोबर जर स्थानिक लोकांच्या गरजेसाठी चीन रस्ते बांधू शकते तर भारत देखील स्थानिकांच्या गरजेसाठी रस्तेबांधणी करत आहे. या विषयावर हरकत घेण्याचे काही कारण नसल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment