सॅल्यूट ! भारतीय लष्कराने विक्रमी वेळेत उभारले 2 पूल, अमरनाथ यात्रेचा मार्ग केला मोकळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्कराने संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी कृती पुन्हा एकदा केली आहे. जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेच्या (Amarnath Yatra) मार्गावरील दोन पूल भूस्खलनामुळे वाहून गेले होते. बालटाल मार्गावरील हे पूल वाहून गेल्यामुळे अमरनाथ यात्रेच्या (Amarnath Yatra) मार्गात अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर लष्कराने विक्रमी वेळेत हे दोन्ही पूल पुन्हा एकदा उभारले आहेत. जवानांनी गुरूवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री काम करून हे पूल उभारले आहेत.

तापमानात अचानक वाढ झाल्यानं बालटाल मार्गावरील कालीमाता जवळील नाल्यांमध्ये पूर आला होता. या पुरात हे दोन्ही पूल वाहून गेले. त्यानंतर प्रशासनानं लष्कराच्या चिनार कोर विभागाला हे पूल पुन्हा उभारण्याची विनंती केली. यानंतर चिनार कोरनं तातडीनं पूल बांधनीचं काम हाती घेतले.

यावेळी हेलिकॉप्टर, खेचरांसह स्वत: सैनिकांनीही आवश्यक सामान वाहून नेलं. त्यानंतर इंजिनिअर रेजिमेंटनं खराब हवामान आणि अंधाराच्या अडथळ्यांचा सामना करत हा पूल पुन्हा एकदा उभारला. त्यामुळे अमरनाथ यात्रेमधील (Amarnath Yatra) अडथळा दूर झाला आहे. अमरनाथ यात्रा 30 जून रोजी सुरू झाली असून पहिल्या तुकडीमध्ये 2750 यात्रेकरूंचा टप्पा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दर्शनासाठी रवाना झाला आहे.

हे पण वाचा :

फडणवीसांना उपमुख्यमंत्री स्वीकारावे लागले हाच खरा भुकंप- संजय राऊत

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या हॉटेलमध्ये बनावट नावाने राहणाऱ्या 2 जणांना अटक

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी

अमरावती हत्याकांडातील मास्टरमाईंडला अखेर अटक; CCTV फुटेजच्या आधारे करण्यात आली कारवाई

मणिपूरमधील भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण जखमी, लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Leave a Comment