हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील (FD) व्याजदरात वाढ करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये अनेक सरकारी आणि खाजगी बँकांदेखील सामील झाल्या आहेत.अशातच आता इंडियन बँकेकडूनही आजपासून (4 ऑक्टोबर) काही कालावधीसाठीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली गेली आहे.
इंडियन बँकेकडून एफडीवरील व्याजदरात 5 बेसिस पॉइंट्स आणि 50 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. तसेच बँकेच्या 610 दिवसांच्या स्पेशल FD योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 6.25 टक्के तर सुपर ज्येष्ठ नागरिकांना 6.5 टक्के वार्षिक व्याज मिळेल. ही दरवाढ RBI च्या रेपो दरात 5.9% पर्यंत वाढवण्याच्या अनुषंगाने केली गेली आहे. तसेच 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्ससाठीच्या व्याजदरातही सुधारणा करण्यात आली आहे. मात्र, ही वाढ फक्त काही दीर्घ कालावधीसाठीच असेल. Bank FD
नवीन दर तपासा
121 दिवस ते 180 दिवस – 3.75% वरून 3.85% पर्यंत 10 बेसिस पॉइंट्सनी वाढ
9 महिन्यांपेक्षा कमी – 4.40% वरून 4.75% वर 35 बेसिस पॉइंट्स वाढ
एफडी दर 1 वर्ष ते 2 वर्षात 5.45% वरून 5.5% पर्यंत 5 बेसिस पॉइंट्सनी वाढ
3 वर्षांपेक्षा कमी – 5.6%
181 दिवसांपासून 9 महिन्यांपेक्षा कमी – 4% वाढून 4.5%
त्याच वेळी, उर्वरित दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आता बॅँकेकडून 7 दिवस ते 14 दिवस आणि 15 दिवस ते 29 दिवसांच्या कालावधीसाठी 2.8%, 30 दिवस ते 45 दिवसांच्या कालावधीसाठी 3%, 46 दिवस ते 90 दिवस आणि 91 दिवस ते 120 दिवसांच्या कालावधीसाठी अनुक्रमे 3.25% आणि 3.50% व्याज दर मिळेल. Bank FD
मात्र 1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठीचा व्याज दर 5.5% राहिला आहे. तसेच 3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठीचा दर 5.75% आहे. जो 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वर बँकेकडून दिला जाणारा सर्वोच्च दर आहे. याव्यतिरिक्त, 5 वर्षे आणि त्याहून जास्त कालावधीसाठी 5.65% पर्यंत व्याज दर दिला जाईल. Bank FD
स्पेशल एफडी स्कीम
हे लक्षात घ्या कि, इंडियन बँकेकडून नुकतेच एक स्पेशल एफडी स्कीम देखील लाँच करण्यात आली आहे. जिचे नाव IND UTSAV 610 असे आहे. यामध्ये बँकेकडून चांगला रिटर्नही दिला जातो आहे. या स्पेशल एफडी योजनेच्या मॅच्युरिटीचा कालावधी 610 दिवसांचा असेल. या योजनेच्या समाप्तीची तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे. Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indianbank.in/departments/new-fixed-maturity-term-deposit-product-ind-utsav-610/
हे पण वाचा :
Credit Card मधून पैसे काढणे कितपत योग्य आहे ??? ही सुविधा कधी वापरावी ते जाणून घ्या
FD Rates : कोणत्या बँकेकडून FD वर किती व्याज मिळत आहे ते पहा
Post Office च्या बचत योजनांवर आता मिळणार जास्त व्याज !!!
PNB ने सुरू केली WhatsApp बँकिंग सर्व्हिस, आता घरबसल्या एकाच मेसेजद्वारे करता येणार ‘ही’ कामे
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत मोठा बदल !!! नवीन दर पहा