भारतीय बँकर्सनी 2021 मध्ये IPO द्वारे केली विक्रमी 2600 कोटी रुपयांची कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । 2021 हे वर्ष भारतीय इंवेस्टमेंट बँकर्ससाठी चांगले वर्ष ठरले. IPO च्या विक्रमी संख्येनेही इंवेस्टमेंट बँकर्स मालामाल झाले. या बँकर्सनी या वर्षी आलेल्या IPO मधून 2600 कोटी रुपये (34.7 कोटी डॉलर्स) पेक्षा जास्त शुल्क जमा केले आहे.

नवी दिल्ली-बेस्ड प्राइम डेटाबेस शोच्या आकडेवारीनुसार, 2017 मध्ये बँकांनी शेअर विक्रीतून गोळा केलेल्या विक्रमी शुल्कापेक्षा यंदाची कमाई चारपट जास्त आहे. ब्लूमबर्गने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, ऑनलाइन किराणा दुकानदारांपासून ते फूड डिलिव्हरी आणि ब्युटी स्टार्टअप्सपर्यंतच्या 110 हून जास्त छोट्या-मोठ्या कंपन्यांनी या वर्षी मुंबईत त्यांचे शेअर्स लिस्ट केले आहेत. कंपन्यांनी यातून सुमारे 18 अब्ज डॉलर्स (1.35 लाख कोटी रुपये) उभे केले आहेत.

2021 ‘हे’ विक्रमी वर्ष
जयशंकर वेंकटरामन, मुंबईतील कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनीच्या इक्विटी कॅपिटल मार्केट्सचे प्रमुख म्हणाले, “हे खूप व्यस्त वर्ष होते. माझ्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत मी असा प्रकार पाहिला नाही. इन्व्हेस्टमेंट बँकर्सने घरूनच काम केले.

ऑक्टोबरमध्ये IPO ने विक्रम केला. Paytm (One 97 Communications Limited), Zomato आणि PB Fintech सारख्या कंपन्यांनी याच महिन्यात बाजारात प्रवेश केला. भारताच्या लिस्टिंगमुळे आशियामध्येही तेजी निर्माण झाली आहे. आशियातील कंपन्यांनीही विक्रमी 181 अब्ज डॉलर्स जमा केले आहेत.

पुढील वर्षही जोरदार अपेक्षित आहे
पुढील वर्षी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या IPO सह अनेक कंपन्या रांगेत आहेत. या कंपन्या किमान 40 हजार कोटी (5.3 अब्ज डॉलर्स) उभ्या करतील असा अंदाज आहे. देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आपल्या म्युच्युअल फंड व्यवसायातील हिस्सेदारी विकून IPO द्वारे सुमारे 1 अब्ज डॉलर्स जमा करू शकते. Flipkart Online Services Pvt आणि Digital-education startup Byju’s देखील IPO साठी तयारी करत आहेत.

कोटक महिंद्राचे वेंकटरामन यांनी आशा व्यक्त केली की, 2022 मध्ये या वर्षाच्या बरोबरीने किंवा त्याहून जास्त रक्कम उभी केली जाईल. मात्र, कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएन्ट, वाढती महागाई आणि व्याजदरात वाढ यासारख्या जोखमींचा बाजारावर परिणाम होऊ शकतो. मात्र बाजारात तेजीचे वातावरण कायम राहण्याची अपेक्षा आहे.

Leave a Comment