आखातात अडकलेल्या भारतीयांच्या ‘घरवापसी’साठी नौदलाच्या १४ युद्धनौका सज्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जगभरात कोरोनाच्या विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर परदेशात राहणारे असंख्य भारतीय अडकून पडले. अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली. परिणामी अनेक भारतीय जगातील विविध भागात अडकले. आता या सर्व भारतीयांना परत मायदेशी आणण्याची तयारी केंद्र सरकारनं सुरु केली आहे. त्यानुसार आखाती देशात अडकून पडलेल्या भारतीयांना देशात परत आणण्यासाठी भारतीय नौदल पुढे सरसावलं आहे.

भारतीयांच्या घरवापसीची जबाबदारी घेत भारतीय नौदलाच्या १४ युद्धनौका आखाती देशांच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यातील ४ वेस्टर्न कमांडमध्ये, ४ पूर्वेकडील कमांडमध्ये आणि ३ दक्षिणी कमांडमध्ये आहेत, अशी माहिती नौदलाचे व्हाईस अ‍ॅडमिरल जी अशोक कुमार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील आयएनएस आंग्रे येथे एकूण ३८ जणांना नौसैनिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १२ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर २ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहितीही अ‍ॅडमिरल अशोक कुमार यांनी एएनआयला दिली. आमच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांमध्ये कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही, असेही ते पुढे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment