हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Overseas Bank : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता सार्वजनिक क्षेत्रातील Indian Overseas Bank (IOB) कडून मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) आणि रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये वाढ करण्यात आली आहे. 10 डिसेंबरपासून बँकेचे हे नवीन दर लागू केले जातील. यामुळे आता टर्म लोनवरील ईएमआय आणखी महागण्याची शक्यता व्यक्त होते आहे.
हे लक्षात घ्या कि, 7 डिसेंबर रोजी झालेल्या RBI च्या धोरणात्मक बैठकीत रेपो दरात 0.35 टक्के वाढ करण्याची घोषणा करण्यात आली. ज्यानंतर Indian Overseas Bank ने आपल्या MCLR रेट्समध्ये 35 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ केली आहे. यासोबतच बँकेने आपल्या RLLR मध्ये देखील बदल केला आहे.
MCLR किती असेल ???
Indian Overseas Bank कडून देण्यात आलेल्या नियामक फाइलिंग मधील माहितीनुसार, आता बँकेचा 1-वर्षाचा MCLR दर 20 बेसिस पॉंईटसने वाढवून 8.25 टक्के केला गेला आहे. तसेच 2 वर्षांच्या MCLR दरामध्ये 25 बेसिस पॉइंट्सने वाढ करून 8.35 टक्के केला गेला आहे. त्याच वेळी, 10 डिसेंबरपासून 3-वर्षांच्या MCLR दरामध्ये 30 बेसिस पॉइंट्सने वाढ करून 8.40 टक्के करण्यात येणार आहे.
अल्प कालावधीसाठीचे नवीन MCLR दर जाणून घ्या
Indian Overseas Bank कडून अल्प कालावधीसाठीच्या MCLR दरातही वाढ केली गेली आहे. ज्यामुळे आता सहा महिन्यांच्या कालावधीसाठीचा MCLR दर 20 बेसिस पॉइंट्सने वाढून 8.15 टक्के झाला आहे. यानंतर आता तीन महिन्यांसाठीचा MCLR दर 8 टक्के तर 1 महिन्याच्या कालावधीचा MCLR दर 7.70 टक्के केला गेला आहे.
शेअर्समध्येही झाली वाढ
हे लक्षात घ्या कि, बुधवारीच इंडियन ओव्हरसीज बँकेकडून MCLR आणि RLLR दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती. यानंतर बँकेच्या शेअर्समध्येही मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. BSE वर बँकेचे शेअर्स शेअर 4.57 टक्क्यांनी वाढून 24.05 रुपयांवर बंद झाले. यावेळी हे शेअर्स 24.85 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकाच्या अगदी जवळ आले आहेत. इंडियन ओव्हरसीज बँकेची सध्याची मार्केट कॅप 45,460 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.iob.in/lending-benchmark-rate
हे पण वाचा :
आता WhatsApp वरही मिळणार फेसबुक-इन्स्टाग्रामचे ‘हे’ फीचर, मार्क झुकरबर्गने दिली माहिती
Ola ने लाँच केली डिसेंबर टू रिमेंबर ऑफर, झिरो डाउन पेमेंटसोबत 1 वर्षासाठी मिळणार फ्री चार्जिंग
Car Discount Offer : चारचाकी घेण्याचं स्वप्न असेल तर 31 डिसेंबरपर्यंत घ्या निर्णय; ‘या’ गाड्यांवर 1.50 लाख…
FD Rates : ‘या’ दोन बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 9% पेक्षा जास्त व्याज
Gold Price Today : सोन्या-चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर