मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपल्यापैकी प्रत्येकाने एकदा तरी रेल्वेनं प्रवास केलाच असणार. रेल्वेचा (Indian Railway) प्रवास सर्वांच्या खिशाला परवडणारा आणि वेळेत पोहोचवणारा असतो. यामुळे सर्वसामान्यांपासून ते अगदी श्रीमंत व्यक्तींपर्यंत जवळ-जवळ सर्वच जण लांबच्या प्रवासासाठी रेल्वेने (Indian Railway) प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे देखील आपल्या प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा घेऊन येत असते.
तुम्ही पाहिलं असेल की स्टेशनवर सफेद रंगाच्या पाटीवर स्टेशनचं नाव लिहिलेलं असतं. पण स्टेशनच्या सुरुवातीला असलेला बोर्ड हा नेहमी पिवळ्या रंगाचा असतो, ज्यावर काळ्या रंगाने स्टेशनचं नाव लिहिलं जातं. पण हा बोर्ड पिवळ्या रंगाचा का असतो? याबद्दल कधी विचार केलाय? यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. चला तर मग जाणून घेऊया यामागे नेमके काय कारण आहे….
पिवळा रंग हा अशा भडक रंगांपैकी एक रंग आहे. जे कोणालाही लांबून सहज दिसू शकते. त्यामुळे पिवळ्या रंगाच्या बोर्डवर लिहिलेले रेल्वे (Indian Railway) स्टेशनचे नाव लोको पायलटला लांबुनच दिसते आणि त्यानुसार तो ट्रेनची स्पीड कमी-जास्त करतो किंवा स्टेशनवर थांबतो. पिवळ्या रंगामुळे लोको पायलटना अंतराचा अंदाज येउन त्यांना रेल्वेचा वेग कमी करण्यास मदत मिळते. तसेच रात्रीच्या वेळीदेखील अंधारातही हा पिवळा रंग स्पष्ट दिसतो. त्यामुळेच रेल्वे स्टेशनचे नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर लिहिले जाते.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती