हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सार्वजनिक ठिकाण म्हंटल की चोरी होण्याची शक्यता ही अधिक असते. त्यातल्या त्यात ते बस स्टॅन्ड किंवा रेल्वे स्टेशन सारखं प्रवाश्यानी खचाकच भरलेलं ठिकाण असेल तर मग चोराची चोरी कशीच पकडली जात नाही. त्यासाठीच आता मुंबई मध्यवर्ती स्टेशनवर (Indian Railways) सुरक्षा वाढवली जाणार आहे. स्टेशनवर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. रेल्वे बोर्डाने रेल टेलसह सामंजस्य करार करत हा निर्णय घेतला आहे. प्रवाश्यांचा होणारे नुकसान रोखण्यासाठी व गुन्हेगाराला पकडण्यासाठी व पाळत ठेवण्यासाठी हे एक महत्वपूर्ण पाऊल असेल असे रेल्वेने मांडलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
किती असतील CCTV कॅमेरे?
रेल्वे स्थानकावर तब्बल 6,122 CCTV कॅमेरे लावले जाणार आहेत. यातील 3,652 कॅमेरे हे फेस रेकग्निशन कॅमेरे असतील म्हणजेच यामध्ये सदर व्यक्तीचा चेहरा आरामात दिसेल. एकूण 364 रेल्वे स्थानकावर हे सर्व CCTV कॅमेरा बसवले जाणार आहेत.
कसे काम करतील हे कॅमेरे? Indian Railways
रेल्वे स्टेशनवर (Indian Railways) एखादा व्यक्ती संशयास्पद वाटल्यास त्याचे फेस रेकग्निशन करून गुन्हेगाराला पकडले जाईल. गर्दीच्या भागाचे व्यवस्थापन करून हे काम केले जाईल. तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, कायद्याचा दुरुपयोग करणार्यांना प्रतिबंधित करणे आणि रेल्वे नियमांचे पालन न करण्यावर लक्ष ठेवलं जाईल. आणि यामुळे गुन्हेगारास पकडन्यास मदत होईल. तसेच हे कॅमेरे गुन्हेगाराचा चेहरा, डोळे, कपाळ देखील ओळखू शकतील.
मुंबई रेल टेल फंडातून बसवले जाणार कॅमेरे
रेल्वे बोर्डाने (Indian Railways) रेल टेलशी सामंजस्य करार करत या करारावर सही घेतली. आणि त्यामुळे आता मध्यरेल्वे स्टेशनवर रेलटेलच्या मदतीने A1, A , B आणि C श्रेणीच्या स्थानकावर निर्भया फंडातून 3652 कॅमरे बसवले जाणार आहेत. हे कॅमेरे स्थानकाच्या प्रतीक्षालय, पादचारी पूल, तिकीट खिडकी, आरक्षण खिडकी, स्थानक वाहनतळ, स्थानक फलक, मुख्य प्रवेशद्वार इत्यादी ठिकाणी बसवले जातील .
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर इत्यादी ठिकाणी नसतील कॅमेरे
काही स्थानके ही सिसिटीव्ही प्रणालीच्या अंतर्गत येणार नाहीत कारण ही स्थानके याआधीपासूनच एकात्मिक सुरक्षा प्रणालीच्या अंतर्गत येतात. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याणसह इतर स्थानकांचा समावेश आहे.