माता वैष्‍णो देवीचं दर्शन करायचंय?; भारतीय रेल्वे देत आहे फक्त 3500 रुपयांचे खास पॅकेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेकडून आपल्या प्रवाशांसाठी अनेक प्रवासाच्या खास ऑफर्स दिल्या जातात. विशेष करून प्रयत्न स्थळे आणि धार्मिक स्थळासाठी होय. अशीच एका खास ऑफर भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी देण्यात आलेली आहे. वैष्णोदेवीला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी भाविकांसाठी रेल्वेकडून फक्त 3500 रुपये खर्चाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला प्रवासापासून ते राहण्यापर्यंतच्या सर्व सुविधा मिळणार आहे. तर मग जाणून घेऊया कि नेमके कसे आहे हे अनोखे पॅकेज….

भारतीय रेल्वेकडून माता वैष्णोदेवीसाठी देण्यात आलेल्या या अनोख्या पॅकेजसाठी किती खर्च करावा लागेल असा विचार तुमच्या मनात आला असेल. कंफर्ट क्लाससाठी प्रत्येक व्यक्तीमागे 3 हजार 515 रुपये खर्च करावे लागतील. लहान मुलांसाठीही तितकाच खर्च आहे. हे पॅकेज घेतल्यास तुम्हाला श्री शक्ति एक्स्प्रेसने प्रवास करावा लागेल.

Mata Vaishno Devi

या लिंकवर मिळतेय पॅकेजची पूर्ण माहिती

तुम्ही अधिकृत लिंकवर जाऊनही या पॅकेजची पूर्ण माहिती मिळवू शकता. या https://irctctourism.com/pacakage_description?packageCode=NDR04 लिंकवर तुम्हाला पॅकेजची पूर्ण माहिती मिळेल.

भारतीय रेल्वे mata vaishnodevi

किती दिवसांचा असणार प्रवास?

माता वैष्णोदेवीचे दर्शन करण्यासाठी पहिल्या दिवशी तुम्हाला दिल्लीहून ट्रेनने कटरा येथे जावे लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी कटरा पोहोचल्यानंतर तुम्ही वैष्णोदेवीचं दर्शन करु शकता. तिसऱ्या दिवशी तुमचा परतीचा प्रवास सुरु होईल.

भारतीय रेल्वे

माता वैष्णोदेवीच्या विशेष पॅकेजमध्ये काय मिळणार?

– तुम्हाला थर्ड एसीमध्ये ट्रेनमधून प्रवास करण्याची संधी मिळेल.
– अल्पोपहार आणि नाश्ता मिळेल.
– लॉकरची सुविधा दिली जाईल.
– विश्रांतीसाठी आयआरसीटीसीचं गेस्ट हाऊस मिळेल.
– आंघोळ आणि विश्रांतीसाठीही गेस्ट हाऊस दिलं जाईल.

train

जाणून घ्या पॅकेजबाबत सविस्तर माहिती

– पॅकेजचं नाव – श्री शक्ती फुल डे दर्शन
– प्रवासाचं साधन – ट्रेन
– जाण्याची वेळ आणि स्थानक – NDLS/ 19:05 बजे
– क्लास – थर्ड एसी
– जेवण – एक वेळचा नाश्ता
– राहण्याची सोय – IRCTC चं गेस्ट हाऊस