हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवासी सुविधा सर्वोत्तम करण्यासाठी आणि रेल्वे प्रवासादरम्यान खाण्यापिण्या संदर्भात प्रवाशांना येणाऱ्या अडचणींना मूठमाती मिळावी या उद्देशाने रेल्वेच्या Centre for Railway Information Systems (CRIS) आणि Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) यांना एकत्रितपणे काम करण्यासाठी निर्देश दिले आहेत. जेणेकरून प्रवास्यांना येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर सोडवल्या जातील व रेल्वे प्रवासाचा दर्जा अधिक सुधारेल .
SMS करून दिली जाईल सुविधा-
रेल्वे बोर्डने (Indian Railway) दिलेल्या निर्देशांनुसार ज्या प्रवाश्यांनी प्रवासासाठी आपले तिकीट बुक केलेले आहे पण जेवण सुविधेसाठी नोंदणी केलेली नाही अश्या प्रवाश्यांना रेल्वे प्रवास सुरु होण्याच्या 48 तास अगोदर जेवण सुविधा घेण्यासाठी मोबाईल वर SMS पाठवला जाईल. कन्फर्म तिकीट असलेल्या ज्या प्रवाशांनी तिकिट बुकींग दरम्यान भोजन सेवा बंद केली आहे, त्यांना जेवणाचे बुकिंग करायचे असल्यास त्यांना लिंकसह SMS मिळेल. ज्या प्रवाशांची तिकिटे नंतर कन्फर्म झाली आहेत परंतु बुकिंगच्या वेळी जेवणाची सेवा निवडली आहे त्यांना प्रवासाच्या ४८ तास आधी दुसरा एसएमएस पाठवला जाईल. तसेच ज्या प्रवाश्यांनी प्रवासाचे तिकीट बुक करते वेळेसच जेवणासाठी नोंदणी केलेली असेल अश्याना प्रवास सुरु होण्याच्या 24 तास अगोदर SMS पाठवला जाईल.
रेल्वेत मिळणार जेवणाचा मेन्यू- (Indian Railway)
IRCTC द्वारे पाठवल्या गेलेल्या SMS च्या माध्यमातून प्रवाश्यांना जेवण्याच्या मेनू बद्दल माहिती पुरवली जाईल. तसेच अन्य खाणपाना संदर्भात माहिती दिली जाईल. जेणेकरून IRCTC मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवेत अधिक सुधारणा होऊ शकेल . त्यातून प्रवाशांच्या समस्या अधिक चांगल्या पद्धतीने सोडवल्या जातील. सध्या तिकीट बुकिंग केलेल्या प्रवाश्यांनी जेवण्याच्या बुकिंग केल्यानंतर जेवणाच्या तयारीसाठी उपलब्ध असलेल्या कमी वेळेमुळे फक्त शाकाहारी जेवण दिले जाते , कारण सध्याची बुकिंग सुविधा ट्रेन सुटण्याच्या 15 मिनिटांपूर्वी उपलब्ध आहे.
एनवेळी मिळेल जेवणाची सुविधा
प्रत्येक झोन मध्ये धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये वेळोवेळी कर्मचाऱ्यांद्वारे घोषणा करण्यासाठी रेल्वे बोर्डने निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रवाशी आपले जेवण आणि त्या संदर्भातील अडचणी सोडवू शकतील. मात्र ज्या प्रवाश्यांनी वेळोवेळी आठवण करून सुद्धा जेवण बुक केले नसेल त्यांना 50 रु. अधिक देऊन ऐनवेळी जेवणाची सुविधा दिली जाईल.