हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवसेंदिवस भारतीय रेल्वे (Indian Railways) प्रगतीच्या मार्गावर जात आहे. त्यातच जर भारताने ट्रेनमधून अतिरिक्त 1500 दशलक्ष टन मालाची वाहतूक यशस्वीरीत्या केली तर 2031 पर्यंत डिझेल खर्चात वार्षिक 1.28 लाख कोटी रुपयांची बचत होऊ शकते. असे विधान केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. 68 व्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
देशामध्ये होणार अतिरिक्त 3000 दशलक्ष टन मालवाहतूक- (Indian Railways)
या कार्यक्रमात बोलताना वैष्णव म्हणाले की, भारताच्या आर्थिक वाढीमुळे देशामध्ये अतिरिक्त 3000 दशलक्ष टन मालवाहतूक होईल. त्यामुळे भारतीय रेल्वे वाढत्या मालवाहतुकीला निम्मी वाढ मिळवण्याच्या मार्गांवर आहे. असे झाल्यास यामध्ये तब्बल 16000 कोटी लिटरची घट होऊ शकते. त्यामुळे हे फायद्याचे आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात 1512 दशलक्ष टन मालवाहतुकीचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. शिवाय मागच्या वर्षी हा उच्चांक 1418 दशलक्ष टनांच्या तुलनेत वाढ दर्शवते. मात्र असे जरी असले तरी सध्या भारतीय रेल्वेचा (Indian Railways) भारताच्या एकूण मालवाहतुकीच्या तुलनेत 30% पेक्षा कमी वाटा आहे. कारण ही मालवाहतूक ही काही प्रमाणात रस्त्याच्या मार्गाने केली जात आहे.
वैष्णव यांनी टाकला पायाभूत सुविधांवर प्रकाश
वैष्णव या कार्यक्रमात बोलत असताना म्हणाले की, रेल्वेच्या (Indian Railways) पायाभूत सुविधाचा विकास होत आहे. ज्यामध्ये नवीन ट्रॅक, नवीन मार्ग जोडणी, नवीन गाड्या, वंदे भारत, अमृत भारत यासारख्या गाड्यांचा यामध्ये समावेश होत आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे ही सध्या प्रगतीपथावर आहे. शिवाय देशाची आर्थिक वाढ ही 2027 पर्यंत देशाला पहिल्या तीन जागतिक अर्थव्यवस्थांपैकी एक बनवेल. असेही ते यावेळी म्हणाले.