हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र आणि राज्य सरकारांनी नागरिकांना वारंवार आवाहन करूनही करोनाबाधित रुग्ण इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. शनिवारी करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या रेल्वेने प्रवास केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्यानंतर भारतीय रेल्वेने ट्विटवर कळकळीचं आवाहन आहे.
रेल्वेने खबरदारी म्हणून लोकांना आपला प्रवास पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. रेल्वेने आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे, ”रेल्वेमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले काही प्रवासी आढळली आहेत. ज्यामुळे रेल्वे प्रवास धोकादायक बनला आहे. त्यामुळं ट्रेनचा प्रवास टाळा. कारण तुमच्या सहप्रवाशाला कोरोना व्हायरस असल्यास तुम्हालाही करोनाचा संसर्ग होऊ शकतो. तेव्हा आपला प्रवास पुढे ढकला आणि स्वत: ला आणि तुमच्या प्रियजनांना सुरक्षित ठेवा.”
Railways has found some cases of Coronavirus infected passengers in trains which makes train travel risky.
Avoid train travel as you may also get infected if your co-passenger has Coronavirus.
Postpone all journeys and keep yourself and your loved ones safe. #NoRailTravel
— Ministry of Railways (@RailMinIndia) March 21, 2020
दरम्यान, देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढण्यामागचे सर्वात मोठे कारण प्रवास आणि एकमेकांना भेटणे असे सांगितले जात आहे. ताज्या घडलेल्या घटनेनुसार आंध्र प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेसने प्रवास करणारे ८ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दुसरीकडे दुबईहून मुंबईत आलेल्या ४ करोना पॉझिटिव्ह रुग्णांनी १६ मार्चला मुंबई ते जबलपूर असा प्रवास ११०५५ गोदान एक्स्प्रेसने केला असल्याची घटना समोर आली आहे. रेल्वेने त्यामुळं रेल्वेने आता करोना फैलावचा धोका लक्षात घेत प्रवाशांना रेल्वे प्रवास टाळण्याचे आवाहन केलं आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.