हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दमदार अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला धक्का बसला होता. हार्दिकच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. मात्र आता तो फिट झाला असून न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात खेळू शकतो असे बीसीसीआय कडून समजत आहे. 31 ऑक्टोबर ला न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाचा महत्त्वपूर्ण सामना असून हार्दिक फिट झाल्याने भारतीय संघाने सुटकेचा निश्वास सोडला.
पीटीआय या वृत्तसंस्थेशी त्याच्या दुखापतीबद्दल बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “हार्दिकच्या खांद्याचा स्कॅन रिपोर्ट आला आहे आणि दुखापत फारशी गंभीर नाही, भारत सहा दिवसांनी त्यांचा सामना खेळेल त्यामुळे हार्दिकला बरे होण्यासाठी पूर्ण वेळ मिळेल. तरी देखील वैद्यकीय पथक प्रतीक्षा करेल आणि प्रशिक्षणादरम्यान हार्दिकला कसं वाटतं हे तपासेल.
दरम्यान, भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात मोठा झटका बसला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला. हार्दिक पंड्या सुद्धा त्या सामन्यात चमकदार कामगिरी करू शकला नाही. अवघ्या 11 धावा काढून हार्दिक तंबूत परतला होता.