भारतीय संघाला झटका; ‘हा’ महत्त्वाचा खेळाडू हॉस्पिटलमध्ये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाला अजून एक धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. हार्दिक च्या उजव्या खांद्याला दुखापत झाली असून तो हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्या जागी मैदानात फिल्डिंगसाठी इशान किशन आला होता.

28 वर्षीय हार्दिक दुखापतीनंतर मैदानात आला नाही. जर त्याची दुखापत गंभीर झाली तर विराटच्या टीम इंडियासाठी ही अत्यंत चिंतेची बाब असेल. हार्दिकला टी -20 वर्ल्डकपमध्ये फिनिशरची भूमिका सोपवण्यात आली आहे. दुबईत रविवारी झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला.

दरम्यान, पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा झटका बसला. ज्या मैदानात भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडली त्याच मैदानावर पाकिस्तान ने तब्बल 10 विकेट राखून विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाला पुढील सामन्यात दमदार खेळ दाखवावा लागेल.