Apple Store Mumbai : भारतातील पहिले Apple Store मुंबईत सुरू; पहा Inside Photos

Apple Store Mumbai
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल निर्माता कंपनी अॅपलने देशातील आपले पहिले स्टोअर मुंबईत सुरू केलं आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये Apple BKC या नावाने हे स्टोअर उघडण्यात आले आहे. खास गोष्ट म्हणजे यावेळी अॅपलचे सीईओ टिम कुक हे उद्घाटनासाठी आले होते.

Apple Store Mumbai  Apple च्या अधिकृत स्टोअरला भेट देऊन तुम्ही ब्रँडची उत्पादने खरेदी करू शकता. या स्टोअर मध्ये तुम्हाला Apple चे अधिकृत कर्मचारी इन-हँड फीलसह दिसतील. या कर्मचाऱ्यांमुळे तुम्हाला चांगल्या सोयी आणि सुविधा मिळतील. माहितीनुसार, मुंबईतील या स्टोअर मध्ये कंपनीने 100 जणांचा स्टाफ नेमला आहे. हे कर्मचारी २० भाषांमधून ग्राहकांशी संवाद साधतील .

Apple Store Mumbai Apple चे हे स्टोअर दिसायला खूपच मस्त आणि आकर्षक आहे जे पाहताक्षणीच तुम्हाला वेड लागेल. हे संपूर्ण स्टोअर 20,000 चौरस फुटांमध्ये पसरलेले आहे. या स्टोअरच्या छतामध्ये 1,000 टाइल्स आहेत आणि प्रत्येक टाइल लाकडाच्या 408 तुकड्यांपासून बनवलेली आहे. ते इतके आकर्षक आहे की नक्कीच तुमचं लक्ष्य वेधून घेईल.

Apple Store Mumbai

पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी स्टेनलेस स्टीलच्या पायऱ्या 14 मीटरच्या जवळ आहेत. स्टोअर ऑपरेशन्ससाठी सोलर अॅरेचा वापर केला आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 दगडी भिंतीही दिसतील. हे दगड खास राजस्थान मधून मागवण्यात आलेले आहेत.

Apple Store Mumbai

Apple च्या देशातील या पहिल्या स्टोअर मध्ये तुंम्हाला काचेच्या भिंती, पेंटिंग्ज आणि झाडे -झुडपेही आढळतील. तुम्हाला स्टोअरमधील सर्व उत्पादनांचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. या स्टोरला आत्तापर्यंत हजारो मुंबईकरांनी भेट दिली आहे.

Apple Store Mumbai

Apple ने घोषणा केली आहे की येत्या 20 एप्रिलला कंपनी देशाची राजधानी असलेल्या दिल्ली मध्ये आपलं दुसरं स्टोर सुरु करणार आहे. Apple Sacket असं त्या स्टोअरचे नाव असेल .