हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या ओमिक्रोन आणि कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. या नव्या कोरोनाच्या ओमिक्रॉनने अनेकांना जखडले आहे. दरम्यान भारतात ओमिक्रॉनचा पहिला बळी गेला आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये हा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
याबाबात अधिक माहिती अशी की, संबंधित मृत्यू पावलेली व्यक्ती ७२ वर्षीय रुग्ण असून ती ओमिक्रॉन पॉझिटिव्ह निघाली होती. त्यानंतर त्या व्यक्तीची चाचणी केली असता ती सुरुवातीला निगेटिव्ह आली. परंतु प्रकृती स्वास्थ्यामुळे त्या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
देशात ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने याबाबत महत्वाची महिती दिली आहे. देशातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या 2 हजार 135 झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि दिल्लीतून सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 653 आणि दिल्लीत 464 रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनवरील 2 हजार 135 रुग्णांपैकी 828 बरे झाले आहेत.