हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने तब्बल 113 धावांनी भारताने ही कसोटी मारली असून या सामन्यात गोलंदाजांनी विशेष कामगिरी केली आहे. केएल राहुलचे शतक आणि भारतीय गोलंदाजांची अचूक कामगिरी हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. या विजयासह भारताने 3 कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी पाचव्या दिवशी फक्त 6 विकेट्सची गरज होती. भारतीय गोलंदाजानी दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 191 धावांत गुंडाळले. भारतीय संघाकडून मोहम्मद शमी आणि बुमराह ने प्रत्येकी 3 तर अश्विन आणि सिराज ने प्रत्येकी 2 बळी घेतले.
#TeamIndia go 1-0 up in the series with their first ever Test win at Centurion.#SAvIND pic.twitter.com/DB68dMunHL
— BCCI (@BCCI) December 30, 2021
भारताने प्रथम फलंदाजी करत 327 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात फक्त 197 धावा करता आल्या. त्यानंतर भारताला 130 धावांची आघाडी मिळाली. परंतू दुसऱ्या डावात भारतीय संघाला अवघ्या 174 धावा करता आल्या. दक्षिण दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 धावांची आवश्यकता होती मात्र भारतीय गोलंदाज्यांच्या दमदार कामगिरीने यजमानांचा अवघ्या 191 धावांत खुर्द उडाला