औरंगाबाद – औरंगाबादहुन दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद साठी इंडिगोने काल पासून पुन्हा एकदा दररोज उडान घेण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी ही तिन्ही विमाने प्रवाशांनी फुल होती, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली. जानेवारीच्या तुलनेत आता पुन्हा एकदा औरंगाबादेतील विमानांची आणि प्रवाशांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे.
औरंगाबादहुन सध्या एअर इंडिया आणि इंडिगोची विमान सेवा सुरू असून, दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी हवाई कनेक्टिव्हिटी आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबाद या तिन्ही विमानसेवांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका बसला. विमानसेवा विस्कळीत झाली. परंतु, कालपासून इंडिगोची दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या तिन्ही शहरांसाठी पुन्हा एकदा दररोज विमानसेवा सुरू करण्यात आली.
दिल्लीचे 180, मुंबईचे 186 आणि हैदराबादचे 78 आसनी विमान आहे. ही तिन्ही विमाने प्रवाशांनी फुल होती. अवघ्या महिनाभरातच विमानसेवा आणि प्रवासी संख्या आता पूर्वपदाकडे येण्यास सुरुवात झाली आहे.