हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून इंडोनेशिया पाम तेल आणि त्याच्या कच्या मालाच्या निर्यातीवर निर्बंध लावणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती वाढणार आहे. इंडोनेशिया जगभरातील सर्वात मोठा पाम तेल उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे. देशांतर्गत तेलाच्या वाढणाऱ्या किंमतींना आळा घालण्यासाठी इंडोनेशिया कमोडिटी निर्यातीवर बंदी घालणार आहे.
याचा सर्वाधिक फटका भारताला बसणार आहे. कारण भारत आपल्या गरजेपैकी अर्धे तेल इंडोनेशियाकडून घेतो. मात्र इंडोनेशियन हे देखील स्पष्ट केले आहे कि, फक्त रिफाईंड, ब्लीच्ड आणि डेडोराइज्ड (RBD) पाम तेलांवरच बंदी घातली आहे. क्रूड पाम ऑइल आणि इतर डेरिव्हेटीव्ह प्रॉडक्ट्स ची निर्यात ही आधीप्रमाणेच सुरू राहणार आहे.
भारताने मार्च महिन्यात इंडोनेशियाकडून १,४५,६९६ प्रति टन RBD तेल आणि २,०७,३६२ प्रति टन पाम तेलाची आयात केली आहे. भारताने आपल्या एकूण पाम तेलाच्या आयातीपैकी अर्ध्यासाठी इंडोनेशियावर अवलंबून आहे. पाम तेलाच्या जागतिक निर्यातीत इंडोनिशियाचा वाट हा 60% आहे. मात्र एक्सपर्टस् चे असे म्हणणे आहे कि, जास्त काळ निर्यात बंद ठेवणे देखील हे इंडोनेशियाच्या हिताचे नाही.