हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय कीर्तनकार इंदोरीकर महाराज (indorikar maharaj) हे नेहमी आपल्या कीर्तन आणि वक्तव्यमुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या कीर्तनाचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण आता कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी (indorikar maharaj) मोबाईल आणि युट्यूब चॅनेलचा चांगलाच धसका घेतला आहे. प्रसिद्धीसाठी आणि टीआरपीसाठी मला बदनाम करू नका, असं म्हणत इंदोरीकर महाराजांनी युट्यूब चॅनल चालवणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.
'जरा भानावर राहत जा' म्हणत इंदोरीकर महाराजांनी युट्यूब चॅनलवाल्यांना सुनावले pic.twitter.com/tLZQzROqw4
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 18, 2022
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात इंदोरीकर महाराज (indorikar maharaj) यांचं कीर्तन पार पडले. या कीर्तनात इंदुलीकर महाराजांचे (indorikar maharaj) एक वेगळेच रूप पाहायला मिळाले. वादग्रस्त कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी (indorikar maharaj) मोबाईल आणि यूट्यूब चॅनेलचा चांगलाच धसका घेतला आहे. हे कीर्तन सुरू होण्यापूर्वीच इंदोरीकर महाराज मोबाईल आणि युट्यूब चॅनेलवाल्यांना चांगलेच फैलावर घेतले. माझ्या विधानांचा विपर्यास केला जात असून प्रसिद्धीसाठी आणि टीआरपीसाठी मला बदनाम केलं जात आहे, असं म्हणत इंदोरीकर महाराज यांनी युट्यूब चॅनल चालवणाऱ्यांना मोबाईल बंद करण्याचा सल्ला दिला.
काय म्हणाले इंदोरीकर महाराज ???
‘आमचं आधी नीट समजून घेत जा, नाहीतर त्याचीच क्लिप व्हायरल कराल, इंदोरीकर महाराज वादग्रस्त विधान करून मोकळे झाले. अरे जरा भानावर राहत जा, महाराजांना काय म्हणताय त्यांचंही मत जाणून घेत जा, उगाच टीआरपीसाठी दुसऱ्यांच्या इज्जती घालवू नका. अर्थ जरा समजून घेत जा, असं इंदोरीकर (indorikar maharaj) महाराज म्हणाले. त्यांच्या या कीर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हे पण वाचा :
PAN Card ऑनलाइन व्हेरिफाय करण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या
EPF account मध्ये आपले बँक डिटेल्स कसे अपडेट करायचे ते समजून घ्या
Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा दरमहा 5000 रुपये !!! कसे ते जाणून घ्या
Business Idea : सतत मागणी वाढणाऱ्या ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये !!!
Sukanya Samrudhi Yojana मध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करून जमवा मोठी रक्कम !!!