हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Inflation : जगभरात सध्या मंदीचे वातावरण आहे. अशातच महागाई देखील वाढते आहे. ज्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसू शकतो. कारण देशातील आघाडीची FMCG कंपनी असलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) कडून लवकरच आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवल्या जाण्याची शक्यता आहे. नुकत्याच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये आता लवकरच साबण, शॅम्पू, टूथपेस्ट यांसारख्या दैनंदिन गोष्टी महागणार असल्याचे म्हंटले जात आहे.
रॉयल्टी शुल्कात वाढ
कंपनीकडून मिळालेल्या एका माहितीनुसार, हिंदुस्तान युनिलिव्हर PLC ने रॉयल्टी शुल्कात 80 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. हे जाणून घ्या कि, गेल्या 10 वर्षात HUL मध्ये पहिल्यांदाच रॉयल्टी शुल्कात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 2013 मध्ये शेवटची दरवाढ करण्यात केली गेली होती. Inflation
रॉयल्टी शुल्क 3.45 टक्के केले जाणार
याविषयी माहिती देताना HUL ने म्हटले की, नवीन करारानुसार रॉयल्टी आणि केंद्रीय सेवा शुल्क 3.45 टक्क्यांपर्यंत वाढवले जाऊ शकते. गेल्या आर्थिक वर्षात तो 2.65 टक्क्यांवर होता. रॉयल्टी शुल्कातील ही 80 बेस पॉइंट्सची वाढ 3 टप्प्यांमध्ये लागू केली जाऊ शकते. त्यानंतर महागाईने आधीच होरपळणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. कारण आता असे मानले जात आहे कि, कंपनी आपल्या दैनंदिन वस्तूंच्या किंमती वाढवू शकते. Inflation
कंपनीच्या उत्पादनांविषयी जाणून घ्या
ही प्रसिद्ध कंपनी पर्सनल केअर व्यतिरिक्त, फूड, होम केअर, वॉटर प्युरिफायर यांसारख्या अनेक उत्पादनांची देखील निर्मिती करत आहे. त्याचप्रमाणे मीठ, मैदा, कॉफी, चहा, केचअप, ज्यूस, आईस्क्रीम, चाक, स्वच्छ धुवा, सर्फ, डब, शेव्हिंग क्रीम यासह सर्व उत्पादनांचा देखील समावेश आहे. Inflation
कंपनीच्या महसुलाबाबत जाणून घ्या
गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसुल 51,193 कोटी रुपये होता, जो गेल्या एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 11.3 टक्क्यांनी जास्त होता. ज्यापैकी 2.65 टक्के रक्कम कंपनीने तिच्या मूळ कंपनीला रॉयल्टी म्हणून दिली होती. आता या वाढीनंतर कंपनीला आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत. Inflation
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hul.co.in/brands/
हे पण वाचा :
118 वर्षे जुन्या City Union Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, पहा नवीन व्याजदर
‘या’ Tax Saving Scheme मध्ये गुंतवणूक करून मिळवा कर सवलत !!!
विमानातील लघवीप्रकरणी Air India ला 30 लाखांचा दंड, DGCA ची मोठी कारवाई
Ration Card : मोफत रेशन घेणाऱ्या करोडो लोकांसमोर उभे नवीन संकट, जाणून घ्या त्याविषयीची माहिती
Kisan Credit Card म्हणजे काय ??? याद्वारे अशा प्रकारे मिळवा स्वस्त दरात कर्ज !!!