प्रेरणादायी : पै. संतोष वेताळ यांच्याकडून आ. निलेश लंके यांना एक लाखाचा धनादेश आणि अडीच किलोची चांदीची गदा

कराड तालुक्यातील सुर्ली येथील प्रतिष्ठानच्यावतीने गाैरव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील सुर्ली येथील हिंद केसरी पैलवान संतोष आबा वेताळ यांच्या हस्ते अडीच किलो चांदीची गदा, एक लाख रुपये धनादेश आणि सन्मानपत्र देऊन आ. निलेश लंके यांना गौरविण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे कोरोना लढवय्या आमदार निलेश लंके यांना कोरोना केसरी किताब केसरी हिंद प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आला आहे.

यावेळी नवनाथ पाटील, सरपंच दत्तात्रय वेताळ, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष निसार मुल्ला, सोनू मदने, कृष्णा मदने, संदीप माने, अमोल लंके, सुरज भुजबळ उपस्थित होते. यावेळी पै. संतोष वेताळ म्हणाले, कोरोनाला हरविण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे लढताना दिसत आहेत. आपल्या लोकांच्यासाठी कोरोना सेंटर उभारून त्यांची सेवा करत आहेत. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही त्यांना अर्थिक मदत करत आहोत. त्याचसोबत लढवय्या आमदाराला अडीच किलोची चांदीची गदा देवून गाैरव करताना आनंद होत आहे.

शरद पवारांच्या वाढदिसाची चांदीची गदा आ. निलेश लंकेना भेट

कोरोना केसरी किताब मला दहा हत्तीचे बळ देईल. मी पवार साहेबांचा निष्ठावंत भक्त आहे. कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. पवार साहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने देण्यासाठी आणलेली गदा मला देण्यात आली हे माझे भाग्य आहे. कुस्ती क्षेत्रातील दिलेला किताब मला कोरोनाच्या लढाईसाठी बळ देईल असे आ. निलेश लंके यांनी सांगितले.

You might also like