Interesting News : भारताला समुद्रात सापडलंय घबाड; 60 दशकांपूर्वीचा शोध आजही लावतोय अर्थव्यवस्थेला हातभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Interesting News) आपला देश हा विविध पद्धतीने संपन्न मानला जातो. यातच सागरी संपत्तीचा देखील मोठा वारसा आपल्या देशाला लाभलेला आहे. पृथ्वीवर भूखंडापेक्षा जास्त भाग पाण्याचा असून त्यामध्ये महासागराचा भाग सर्वाधिक आहे. ज्यामध्ये जगाच्या उत्पत्तीची अनेक रहस्य दडली आहेत. यांपैकी काही वैज्ञानिकांच्या संशोधनातून उलगडली. तर काही अद्यापही समुद्राच्या पोटात सुरक्षित आहेत. द्वापार युगापासून समुद्राच्या पोटातून विविध आश्चर्यकारक गोष्टी बाहेर येत असल्याचे अनेक महाकथा, पुराण, तसेच पुस्तकांमध्ये नमूद केलेले आहे. असंच एक आश्चर्य भारतीय समुद्रात देखील सापडलं आहे.

अनेक वर्षांपूर्वी भारतातील समुद्रात खजिन्याचा मोठा साठा सापडल्याचे सांगितले जाते. (Interesting News) त्या क्षणापासून देशाची सुरू झालेली प्रगती आजही सुरू आहे. त्यामुळे खोल समुद्रात सापडलेला हा खजिना एखाद्या घबाडापेक्षा कमी नाही, असे म्हटले तर आश्चर्य वाटायला नको. कारण गेली ५० वर्ष समुद्राच्या पोटातून मिळणारा हा खजिना अजूनही भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी हातभार लावतो आहे. चला तर जाणून घेऊया समुद्राच्या पोटातून सापडलेला हा खजिना नेमका काय आहे? आणि तो कुठे व कुणाला सापडला?

६० दशकांपूर्वी सापडला भारतीय समुद्रात खजाना (Interesting News)

भारतातील समुद्रात सापडलेला खजाना मुंबई हाय फील्ड. ज्याला पूर्वी ‘बॉम्बे हाय’ म्हणून ओळखले जायचे. संपूर्ण देशातील हे एक मोठे आणि महत्त्वाचे खनिज तेल क्षेत्र आहे. भारताच्या कॅबे सेक्टर खाडीमध्ये मुंबईच्या पश्चिम किनारपट्टी पासून समुद्रात साधारण १७६ किलोमीटर अंतरावर म्हणजेच १०९ मैलाच्या अंतरावर आणि ७५ मीटर अर्थात २४६ फूट अंतरावर हे तेलाचे साठे आहेत. जे गेल्या ६० दशकांपूर्वी १९७४ साली इंडो- सोवियत टीमने संशोधनातून शोधून काढले होते. असा हा अनेक दशकांपूर्वी लागलेला शोध आजही भारताच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान ठेवत आहे.

५० वर्षांची पूर्तता

(Interesting News) १९७४ सालामध्ये रशिया आणि भारत या दोन्ही राष्ट्रांच्या प्रयत्नांमूळे या खनिज तेल साठ्यांचा शोध लागला. ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आणि देशाची प्रगती होऊ लागली. पूर्वी याला ‘बॉम्बे हाय’ म्हणून ओळखले जायचे तेच आता ‘मुंबई हाय फील्ड’ म्हणून ओळखले जाते. या ‘मुंबई हाय फील्ड’ला यंदा ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. इथे २१ मे १९७६ पासून कच्च्या तेलाच्या उत्पादनाची सुरुवात झाली. यानंतर देशाची प्रगती दिवसागणिक वाढताना दिसली. या खनिज तेल साठ्यांमुळे देशाच्या अर्थव्यवहारात मोठा फायदा झाला.

क्रूड ऑइल निर्मिती आणि उत्पादन क्षेत्र

मुंबई हाय फिल्मध्ये सुरुवातीला ३५०० बॅरल तेलाचे उत्पादन घेतले जायचे. मात्र पुढे जाऊन हा आकडा वाढला आणि प्रति दिवस ८० हजार बॅरलवर पोहोचला. (Interesting News) इथे कच्च्या तेलाच्या उत्पादनाची सुरुवात झाल्यानंतर या प्रक्रियेला तंत्रज्ञानाची जोड मिळाली. त्यामुळे टँकरच्या माध्यमातून तेल शुद्धीकरण प्रकल्पांचा वापर केला गेला. पुढे जाऊन या प्रकल्पांमध्ये टँकर पाठवण्याऐवजी सब वे पाईपलाईनच्या माध्यमातून तेल पोहोचवण्याची सुरुवात झाली. अशा प्रकारे क्रूड ऑइल निर्मिती आणि उत्पादन क्षेत्रांमध्ये मुंबई हाय फिल्डचा मोलाचा वाटा राहिला आहे.

२२१ अब्ज घनमीटर गॅस निर्मिती

सुरुवातीच्या ५० वर्षांमध्ये मुंबई हाय फिल्डच्या माध्यमातून ५२.७ कोटी तेलाचे उत्पादन करण्यात आल्याचे, ONGC रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. यानुसार, आत्तापर्यंत २२१ अब्ज घनमीटर गॅस निर्मिती करण्यात आल्याचे समजते. (Interesting News) हा आकडा देशपातळीवर मोठे यश असल्याचे खुणावतो. त्यामुळे अधिकृत आकडेवारी लक्षात घेता मुंबई हाय फील्ड हे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावण्यासाठी महत्त्वाची बाब असल्याचे स्पष्ट होत आहे.

येत्या काळात आणखी विकासाची आशा

आत्ताच्या परिस्थितीत, मुंबई हाय फिल्ड्स मधून प्रतिदिवशी १.३५ लाख बॅरल तेल निर्मिती आणि १३ अब्ज घनमीटर गॅस तयार केला जातो. दरम्यान, सरकारच्या वतीने अनेक पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ज्यामध्ये या दोन्ही प्रकल्पांचा समावेश आहे. यात केलेल्या गुंतवणुकीचा आकडा मोठा असून हे क्षेत्र पुढील काही काळात आणखी जास्त विकास करेल अशी आशा आहे. तसेच तेलाचा तुटवडा किंवा कमतरता भासू नये यासाठी मुबलक साठा असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. (Interesting News)