हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. या विळख्यातून बलाढ्य म्हणून ओळख असलेल्या अमेरिका सुद्धा सुटला नाही आहे. अमेरिकेत करोनाचा संसर्ग वाढत असून मागील पाच दिवसांत तब्बल १० हजार जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर एक हजारहून अधिक जणांचा जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत करोना वेगाने फैलावत असल्याचे चित्र असून चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतील सर्वच ५० राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत ६८ हजार ५७२ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. सर्वाधिक करोनाचे रुग्ण आढळल्याच्या यादीत चीन, इटली नंतर अमेरिका तिसऱ्या स्थानावर आहे.
वॉशिंग्टन डीसी प्रशासनाने २४ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग, कामकाजांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन, आयोवा, लुसियाना, उत्तर कॅरोलिना, टेक्सास आणि फ्लोरीडा राज्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनांना मंजूरी देण्यात आली आहे. करोनावर मात करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कसह अनेक राज्यांसाठींच्या मदतीला मंजूरी दिली आहे.
करोनाच्या संसर्गामुळे १० कोटीहून अधिक अमेरिकन नागरिक सध्या लॉकडाऊनमध्ये आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. अमेरिकन सिनेट आणि व्हाइट हाऊसमध्ये २००० अब्ज डॉलरचे पॅकेज जाहीर करण्याबाबत एकमत झाले आहे. मंजूर करण्यात आलेल्या पॅकेजमुळे अमेरिकन नागरिकांच्या हातात थेट रक्कम देण्यात येणार आहे. लहान व्यावसायिकांना अनुदान देण्यात येणार असून मोठ्या कंपन्यांना कर्ज उपलब्ध करून