औरंगाबाद – मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद शहरात पर्यावरण पूरक डबल डेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यास प्रवास क्षमता दुपटीने वाढून खर्चात कपात होईल. महापालिकेने पर्यावरण पूरक बस साठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत.
क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती वन, सफारी पार्क, पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, स्मार्ट बस, नेहरू भवन पुनर्विकास, माझी वसुंधरा, लाईट हाऊस, शहर विकास योजना, गुंठेवारी विकास अधिनियम, ऐतिहासिक दरवाजे संवर्धन, डॉ. सलीम अली तलाव संवर्धन, आरोग्य इत्यादी संदर्भात संगणकीय सादरीकरण त्यांनी पाहिले.
स्मार्ट सिटी कार्यालयात मनपाच्या विकास कामांचा आढावा बैठकीत आदित्य ठाकरे बोलत होते.