हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment : प्रत्येक गुंतवणुकदाराला सुरक्षित गुंतवणुकीबरोबरच जास्तीत जास्त रिटर्न हवा असतो. मात्र हे लक्षात घ्या कि, अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये गुंतवणुक करून चांगल्या रिटर्नसोबतच टॅक्स सूट देखील मिळेल. चला तर मग आज आपण अशाच काही योजनांबाबत जाणून घेउयात…
किसान विकास पत्र ही लहान गुंतवणूक योजनेपैकी एक आहे. यामधील गुंतवणुकीवर गॅरेंटर्ड रिटर्न मिळतात. या योजनेतील गुंतवणूकीवर ग्राहकाला 6.9 टक्के वार्षिक व्याज दिले जाते. तसेच या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 124 महिन्यांचा आहे. या योजनेमध्ये कमीत कमी 1,000 रुपयांची गुंतवणूक करता येते. यामध्ये जास्तीच्या गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. मात्र, यावर PPF आणि NSC सारखी टॅक्स सूट मिळणार नाही. Investment
मुलींच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार कडून सुकन्या समृद्धी योजना राबविली जाते. या योजनेमध्ये PPF प्रमाणे एक्झम्प्ट-एक्झम्प्ट-एक्झम्प्ट (EEE) चा टॅक्सच्या दर्जा देखील मिळतो. तसेच यामध्ये बँकेच्या एफडीपेक्षा 7.6 टक्के चांगले वार्षिक व्याज मिळते. Investment
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये 6.8% दराने (चक्रवाढ व्याज) वार्षिक व्याज दिले जाते. तसेच यामध्ये गॅरेंटेड रिटर्न देखील मिळतो. या योजनेसाठी इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत, टॅक्स सूट देखील मिळते. या योजनेचा मंच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. तसेच यामध्ये कमीत कमी 100 रुपयांची गुंतवणूक करता येते. त्याच बरोबर यामध्ये जास्तीच्या गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. Investment
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) मध्ये गुंतवणुक केल्यास यावर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. यामध्ये इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत, योजनेची 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक रक्कम, व्याज आणि परिपक्वता करमुक्त आहे. सध्या या योजनेतील गुंतवणुकीवर ग्राहकांना 7.1% व्याज दिले जाते. हे लक्षात घ्या कि, कोणत्याही बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर इतका व्याज दर दिला जात नाही. Investment
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही 60 वर्षे वय ओलांडल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये गुंतवणूक करून मासिक पेन्शन मिळवता येईल. ज्यांना पेन्शन मिवायची असेल त्यांना यामध्ये 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करून प्रत्येक तिमाहीत व्याजाचा लाभ मिळवू शकतात. या योजनेत गुंतवणूक करणारे नागरिक त्यांच्या जोडलेल्या खात्यातून व्याजाची रक्कम काढू शकतात. या योजनेत गुंतवलेली मूळ रक्कम मुदतपूर्तीनंतर परत केली जाते. ज्येष्ठ नागरिकांना हवे असेल तर ती रक्कम नव्याने पुन्हा त्याच योजनेमध्ये गुंतवता येतील. Investment
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=55
हे पण वाचा :
Gold Price : सोने-चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती !!!
Investment : ELSS की PPF यापैकी कोणती योजना जास्त फायदेशीर आहे ??? तज्ञांकडून जाणून घ्या
FD Rates : अल्पावधीत FD वर 7.5% पर्यंत व्याज देणाऱ्या टॉप 10 बँकांची लिस्ट पहा
1 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करा Demat Account शी संबंधित ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकेल खाते !!!
SBI MODS : खुशखबर !!! आता कोणत्याही दंडाशिवाय SBI च्या ‘या’ FD खात्यातून काढता येतील पैसे