हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment : इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत काही योजनांमध्ये गुंतवणूक करून करदात्यांना टॅक्स बेनिफिट्स मिळतात. युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट्स, नॅशनल पेन्शन स्कीम्स, स्मॉल सेव्हिंग स्कीम्स, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स (ELSS) आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) या योजना इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत येतात. यापैकी, कर बचत करण्यासाठी PPF आणि ELSS चे पर्याय निवडणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे.
PPF आणि ELSS बाबत गुंतवणूकदारांमध्ये क्रेझ वाढतच आहे. या दोन्ही योजनांमध्ये चांगल्या रिटर्न बरोबरच टॅक्स सूट देखील मिळतात. प्रथमदर्शी या दोन्ही योजना सारख्याच वाटतात. मात्र याचे काही तोटे देखील आहेत. Investment
इक्विटी लिंक्ड बचत योजना (ELSS)
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, ELSS फंड हा फ्लेक्सी कॅप फंडासारखाच आहे. यामध्ये फक्त इतकाच फरक आहे की त्यांना आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट मिळते. हे लक्षात घ्या कि, ELSS मध्ये तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. ELSS मध्ये गुंतवणूक करून वार्षिक 1,50,000 रुपयांचा टॅक्स बेनिफिट्स मिळेल. ELSS मध्ये एकरकमी किंवा SIP द्वारे गुंतवणूक करता येते. Investment
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही सरकार समर्थित योजना आहे. यामध्ये केलेली गुंतवणूक 100% सुरक्षित आहे. पीपीएफवरील व्याजदर हा सरकारकडून ठरवला जातो. जे तिमाही आधारावर निश्चित केला जातो. PPF मध्ये एकरकमी किंवा आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 12 हप्त्यांमध्ये 1.5 लाख गुंतवले जाऊ शकतात. त्याच वेळी, किमान वर्षात 500 रुपये जमा केले जाऊ शकतात. पीपीएफमधील गुंतवणुकीवर तीन प्रकारचे टॅक्स बेनिफिट्स दिले जातात. यामध्ये गुंतवलेल्या पैशावर कर कपातीचा लाभ मिळत असेल तर व्याज आणि मॅच्युरिटी रकमेवर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. Investment
कोणती योजना चांगली आहे ???
PPF आणि ELSS पैकी नक्की कशाची निवड करावी. याबाबत गुंतवणूकदार गोंधळात आहे. कारण ELSS हा म्युच्युअल फंडाचाच एक प्रकार आहे. त्याचा लॉक-इन कालावधी PPF पेक्षा कमी आहे. तसेच ELSS मध्ये गुंतवलेले पैसे तीन वर्षांनी काढता येतात, PPF मध्ये हा कालावधी 15 वर्षांचा असतो. त्याचबरोबर ELSS मध्ये मिळणारा रिटर्न आतापर्यंत PPF पेक्षा जास्त आहे. PPF मधील गुंतवणुकीवर 3 प्रकारचे टॅक्स बेनिफिट्स मिळतात. यामध्ये गुंतवलेल्या पैशावर कर कपातीचा लाभ मिळत असेल तर व्याज आणि मॅच्युरिटी रकमेवर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. Investment
आपली जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार निवड करा
गुंतवणूकदाराने आपल्या जोखमीच्या क्षमतेनुसार PPF आणि ELSS यापैकी एकाची निवड करावी. कारण या दोन्हीमध्ये एक सारखेच टॅक्स बेनिफिट्स मिळतात. गुंतवणुकदारांकडून मिळालेले बहुतेक पैसे ELSS कडून इक्विटी आणि इक्विटी-लिंक्ड सिक्युरिटीजमध्ये गुंतवले जातात. मात्र यामध्ये जोखीम जास्त आहे. त्याच वेळी, PPF वरील व्याजाचा दर सरकारद्वारे निश्चित केला जातो. व्याजदर दर तिमाहीत निश्चित केला जातो. त्यामुळे त्यात रिटर्न ठरलेला असतो.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा अशा गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे ज्यांना कोणतीही जोखीम घ्यायची नाही आणि त्यांच्या पैशाची 100 % हमी हवी आहे. तर ELSS ही इक्विटी लिंक्ड गुंतवणूक योजना आहे. त्यामुळे ज्यांना थोडीशी जोखीम पत्करून जास्त रिटर्न मिळवायचा आहे अशा लोकांनी गुंतवणूक करावी. Investment
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=55
हे पण वाचा :
ICICI Bank ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!! 23 वर्षात दिला 220 पट रिटर्न
आता रोजंदारीवरील मजुरांनाही मिळणार 3,000 रुपयांची पेन्शन !!! EPFO च्या या योजने बाबत जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज झाली वाढ, नवीन किंमत पहा
Google Pay वर अशा प्रकारे तयार करा एकापेक्षा जास्त UPI आयडी !!!
गेल्या काही वर्षांत ‘या’ 2 Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना बनवले कोट्यधीश !!!