हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment : सामान्यतः लोकं आपले पैसे फक्त FD मध्ये गुंतवतात. कारण इथे पैसेही सुरक्षित राहण्याबरोबच चांगला रिटर्न देखील मिळतो. तसेच यामध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास एक चांगली रक्कमही मिळते. सध्याच्या काळात बँकांकडून एफडीवरील व्याजदरातही वाढ केली जात आहे. ज्याचा फायदा आता ग्राहकांना मिळतो आहे. मात्र इथे हे लक्षात घ्या की, अनेक सरकारी बचत योजनांमध्ये एफडीपेक्षा जास्त व्याज दिले जात आहे.
नॅशनल सेव्हिंग स्कीम, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि PPF या अशा काही योजना आहेत ज्यामध्ये अनेक बँकांच्या FD पेक्षा जास्त रिटर्न (Investment) मिळत आहे. चला तर मग त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेउयात…
बँकेच्या एफडीवरील व्याजदर
बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँकेकडून सर्वसामान्य नागरिकांना FD वर जास्तीत जास्त 6.10 टक्के व्याज मिळत आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी ते जास्तीत जास्त 6.25 टक्के आहे. त्याचप्रमाणे SBI कडून सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त 5.65 टक्के व्याज मिळत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 6.45 टक्के व्याज दिले जात आहे. आता खाजगी क्षेत्रातील बँकांबाबत बोलायचे झाल्यास, HDFC बँकेकडून FD वर 6.10 टक्के जास्त व्याज दिले जात आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून जास्तीत जास्त 6.60 टक्के व्याज मिळत आहे. त्याच वेळी, ICICI बँक सामान्य नागरिकांना 6.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.60 टक्के व्याज मिळत आहे. Investment
सरकारी बचत योजनांवरील व्याज
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वर 6.8 टक्के आणि किसान विकास पत्रावर 6.9 टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे. त्याच वेळी, PPF वर 7.1 टक्के, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर 7.4 टक्के आणि सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 7.6 टक्के व्याज मिळते. याबोरबरच मंथली इनकम अकाउंट मध्ये 6.6 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. इथे हे लक्षात घ्या कि, दर तीन महिन्यांतून एकदा सरकारकडून या व्याजदरांचे पुनरावलोकन केले जाते. मात्र जूनच्या तिमाहीत झालेल्या पुनरावलोकनात यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. Investment
टॅक्स सूट
सरकारी लहान बचत योजनांमधील गुंतवणुकीवर टॅक्स सूटही दिली जाते. उदाहरणार्थ, जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली तर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्स सूट मिळू शकेल. Investment
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=55
हे पण वाचा :
Gold Price Today : सोने घसरले तर चांदीमध्ये झाली वाढ, आजचे नवीन दर पहा
BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये 197 रुपयांमध्ये मिळवा 100 दिवसांची व्हॅलिडिटी !!!
Viral Video : महिला पोलिसाचा खाकी वर्दीतला ‘हा’ व्हिडिओ व्हायरल; SP ने दिले चौकशीचे आदेश
Investment : ‘या’ 5 लहान बचत योजनांमध्ये गुंतवणुक करून टॅक्स सूटसोबतच मिळवा चांगले रिटर्न
Investment : ELSS की PPF यापैकी कोणती योजना जास्त फायदेशीर आहे ??? तज्ञांकडून जाणून घ्या