व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अजित पवार राष्ट्रवादीत नाराज? पत्रकार परिषदेत घेत दिले स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. मात्र यावेळी कार्यक्रम सुरु असतानाच अजित पवार मधेच उठून गेले तसेच त्यांचं भाषणही झालं नाही त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आपण कधीही नाराज नाही, तेथे आमचे वरिष्ठ नेते असल्याने मी स्वत:हून बोलणं टाळलं असं स्पष्टीकरण देत त्यांनी सर्व चर्चाना पूर्णविराम दिला .

अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिल आहे. मी नाराज नाही. कुणीही बोलू नका असं मला सांगितलं नव्हतं. तर तिथं वरिष्ठ नेते होते. त्यामुळे मी बोललो नाही. मी वॉशरूमला गेलो होतो पण लोकांनी वेगळा अर्थ काढला आणि उगाच मी नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, देशपातळीवर पंजाब, हरियाणा, राजस्थान लम्पी स्किन आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसायाला अडचण निर्माण झाली आहे. हा आजार झालेल्या प्राण्यांचे दुधही शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे येत्या हंगामातील साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी लम्पी आजारावर आळा घालणे गरजेचं आहे असं अजित पवार म्हणाले. मी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार आहे. 16 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखाने कधी सुरु करायचे याबाबत बैठक आहे. 1 ऑक्टोबरला कदाचित कारखाने सुरू होतील. यावेळी अनेक जनावरे येतील आणि त्यामुळे आजार वाढेल, असंही अजित पवार म्हणाले