हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment : प्रत्येकाला कोणत्याही कामाच्या बंधनाशिवाय आरामदायी जीवन जगायची ईच्छा असते. त्यासाठीच पर्यटकजण धडपड करत असतो. बहुतेक पगारदार लोकांना लवकर रिटायर व्हायचे असते. मात्र असे करणे हे अशक्य वाटते. मात्र, त्यासाठी लवकर नियोजन सुरू केल्यास ते सहजरित्या शक्य होऊ शकते.
जर आपण वयाच्या 20-30 मध्ये असाल, तसेच आपली व्यावसायिक कारकीर्द नुकतीच सुरू केली असेल तर रिटायरमेंटचे प्लॅनिंग करण्याची हीच योग्य वेळ आहे. चला तर मग रिटायरमेंटचे प्लॅनिंग कसे करावे याबाबत जाणून घेउयात …\
खर्चांवर नियंत्रण ठेवा
आपल्या दैनंदिन किंवा नियमितखर्चांवर नियंत्रण ठेवणे फार महत्वाचे आहे. जे आपल्या खर्चावर नजर टाकली तर कळेल की आपण कशावर आणि किती खर्च करत आहोत. याद्वारे आपल्याला खर्च कमी करून सेव्हिंग वाढवता येईल.
उत्पन्न आणि खर्चांचे संतुलन
आपला पगार आणि राहणीमानाचा खर्च संतुलित ठेवावा. जर उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला जात असेल तर आपल्याला कर्जाच्या जाळ्यात अडकावे लागेल. आपल्या वाढत्या पगारामुळे राहणीमानाचा दर्जा देखील चांगला होईल त्यामुळे अजिबात घाई करू नका. Investment
लहान लहान आर्थिक उद्दिष्टे ठेवा
लांबचा विचार करण्याऐवजी आधी कमी अंतराचे टार्गेट निश्चित करून ते साध्य करण्याचा प्रयत्न करा. यासाठी SIP मध्ये गुंतवणूक करा किंवा क्रेडिट कार्ड कर्ज काढा. लहान ध्येये आपल्याला दीर्घकालावधीत लवकर रिटायर होण्यासाठी चांगले पैसे मिळवण्यात मदत करतील.
आर्थिक शिक्षण
आजकाल तरुणांमध्ये आर्थिक शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. आपण आर्थिकदृष्ट्या जितके जागरूक असू तितकी चांगली गुंतवणूक करू शकू. यामुळे रिटायरमेंट साठी पैसे जमा करण्यात मदतच होईल.
शहाणपणाने जोखीम घ्या
आर्थिक जोखीम घेण्यास तरुणांनी घाबरू नये. कारण यामुळे त्यांना पुढे जाण्यास प्रेरणा मिळते. तसेच जर काही नुकसान झाल्यास त्यांना त्यातून सावरण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळतो. मात्र, जोखीम घेताना शहाणपणाने घ्या. उदाहरणार्थ, कोणत्याही हाय रिस्क असलेल्या आणि हाय रीटर्न असलेल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपण आपले पैसे गमावणार तर नाही ना… तसेच आपले आर्थिक गणित तर बिघडणार नाही याची खात्री करा. Investment
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.policybazaar.com/life-insurance/investment-plans/best-investment-options-in-india/
हे पण वाचा :
Investment Tips : चांगल्या भविष्यासाठी ‘अशा’ प्रकारे करा पैशांची गुंतवणूक
Investment : वाढत्या महागाईमध्ये मुलांच्या भविष्यासाठी अशाप्रकारे करा गुंतवणूक !!!
Business Idea : कमी पैशांत ‘या’ व्यवसायाद्वारे करा भरपूर कमाई !!!
Business Idea : ‘या’ शेतीद्वारे कमी खर्चात मिळवा 5 पट नफा !!! कसे ते जाणून घ्या
‘या’ देशांमध्ये आहे Johnny Depp ची मालमत्ता, एका चित्रपटासाठी घेतो तब्ब्ल 155 कोटी