हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : जर आपल्या मुलीच्या भविष्यासाठी पैसे जमा करायचे असतील तर सुकन्या समृद्धी योजना फायदेशीर ठरू शकेल. ही एक उत्तम योजना आहे. ज्यामध्ये गॅरेंटेड रिटर्न मिळतो. या योजनेद्वारे आपल्या मुलीच्या लग्नासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी मोठा फंड जमा करता येईल.
हे जाणून घ्या कि, 22 जानेवारी 2015 रोजी मुलींना लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारकडून सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाती उघडता येतील. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये सरकारकडून दरवर्षी 7.6 टक्के दराने व्याज दिले जात आहे. या योजनेमध्ये 250 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येईल. यासोबतच कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो. तसेच एका आर्थिक वर्षात यामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवता येतील. Investment Tips
देश की बेटियों के भविष्य को समर्पित… प्रधानमंत्री @narendramodi जी की अमृत भेंट।
2 दिन में, #IndiaPost द्वारा 10 लाख से अधिक सुकन्या समृद्धि खातें। pic.twitter.com/Fgg1z03t5k
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) February 11, 2023
अलीकडेच 2 दिवसांत उघडण्यात आली 10 लाख सुकन्या समृद्धी योजना खाती
सुकन्या समृद्धी योजना देशातील नागरिकांमध्ये इतकी लोकप्रिय झाली आहे की, अलीकडेच सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत 2 दिवसात 10 लाखांहून जास्त खाती उघडण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत ट्विट करताना म्हंटले होते की,” भारतीय टपाल विभागाने 2 दिवसांत 10 लाखांहून अधिक सुकन्या समृद्धी खाती उघडली आहेत.” Investment Tips
15 वर्षांसाठी पैसे जमा केले जातील
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण 21 वर्षे पैसे जमा करावे लागणार नाहीत. खाते उघडल्यापासून 15 वर्षांसाठीच पैसे जमा करता येतात. मुलीला वयाच्या 21 वर्षापर्यंत व्याज मिळत राहील.
किती रिटर्न मिळेल ???
जर आपल्या मुलीचे वय 1 वर्ष असेल आणि तिच्या नावावर दरमहा 500 रुपये जमा करत असाल तर एका वर्षात एकूण जमा रक्कम 6 हजार रुपये होईल. तसेच जेव्हा मुलीचे वय 22 वर्षे असेल तेव्हा गुंतवणूक 90,000 रुपये होईल. ज्यावर 1,64,606 रुपये व्याज मिळेल. या 21 वर्षांनंतर, मॅच्युरिटीवर 2,54,606 रुपये मिळतील. Investment Tips
पैसे कधी काढता येतील ???
या योजनेमध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. तसेच ही योजना 21 वर्षात मॅच्युर होते. मात्र यामध्ये जमा केलेली रक्कम आपली मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत काढता येणार नाही. तसेच 18 वर्षांनंतरही या योजनेतून एकूण रकमेच्या फक्त 50 टक्केच रक्कम काढता येणार आहे. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर पूर्ण पैसे मिळतील. Investment Tips
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=89
हे पण वाचा :
Bank FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! सरकारी बँका देत आहेत मजबूत रिटर्न
LIC च्या ‘या’ 3 पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून चांगल्या नफ्याबरोबर मिळवा कर सवलत !!!
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ
SBI च्या सर्वोत्तम FD योजनेअंतर्गत ग्राहकांना दिला जातोय सर्वाधिक व्याज दर
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात खालच्या पातळीवरून सुधारणा, जाणून घ्या आजचे दर