हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : आजकाल प्रत्येकजण आपल्या भविष्याबाबत सजग झाला आहे. त्यासाठी ते कुठे ना कुठे गुंतवणूक करत असतात. मात्र अनेकदा माध्यम माहित नसल्यामुळे ते करता येत नाही. जर आपल्यालाही सुरक्षित नफा मिळवायचा असेल तर ही बातमी आपल्यासाठी खूप उपयोगाची ठरेल. आज आपण गुंतवणुकीच्या अशाच काही सरकारी योजनांबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये गुंतवणुक करून नवीन वर्षात मोठा नफा मिळू शकेल.
![]()
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही देखील भारतातील एक अतिशय लोकप्रिय गुंतवणूकीच्या पर्यायांपैकी एक आहे, ज्यामधील गुंतवणुकीवर 7.1% इतका रिटर्न मिळेल. तसेच यामध्ये एका आर्थिक वर्षात 15 वर्षांसाठी 500-1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येऊ शकेल. Investment Tips

आता नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) बाबत बोलूयात. या सरकारी योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडावे लागेल. तसेच यामध्ये 1,000 पासून सुरू होणारी कोणतीही रक्कम गुंतवता येईल. याच्या गुंतवणूकीचा कालावधी 5 वर्षांपर्यंत आहे. Investment Tips

आता नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) ही देखील एक मजबूत रिटर्न योजना आहे. ज्या अंतर्गत गुंतवणुक करून आपल्या रिटायरमेंटनंतरच्या खर्चाची काळजी दूर होईल. यामध्ये दरमहा पेन्शन देखील मिळेल. तसेच यामध्ये NPS-1 आणि NPS-2 या दोन्ही योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. Investment Tips

जर आपण एका मुलीचे पालक असाल तर सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करणे खूप फायद्याचे ठरेल. या योजनेअंतर्गत, अनेक सुविधांसहीत 7.6% पर्यंत जबरदस्त रिटर्न मिळेल. यामध्ये आपली मुलगी 21 वर्षांची झाल्यावरच ही रक्कम काढता येईल. Investment Tips

आता पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम ही आणखी एक जबरदस्त सरकारी योजना आहे. यामध्ये 6.60 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळेल. तसेच यामध्ये 1,000 ते 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. Investment Tips
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये




