हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : सध्याच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारकडून अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करून आपल्याला आर्थिक पाठबळ मिळू शकेल. आजच्या या बातमीमध्ये आपण एका अशा योजनेबाबतची माहिती जाणून घेणार आहोत त्यामधील गुंतवणूकीवर बाजारातील चढ-उताराचा कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे आपल्याला सहजपणे चांगला रिटर्न मिळेल. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिसची MIS स्कीम असे आहे. यामध्ये गुंतवणूक करून मोठी कमाई मिळवता येऊ शकेल.
या योजनेअंतर्गत आपल्या मुलाच्या नावाने देखील खाते उघडता येते. जर आपल्या मुलाच्या नावाने हे खाते उघडले तर त्याची फी आणि इतर खर्च सहजपणे भागवता येऊ शकेल. ज्यामुळे मुलाचे भविष्य देखील सुरक्षित होईल. चला तर मग या योजनेविषयीची माहिती सविस्तरपणे जाणून घेउयात…
मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम काय आहे ???
या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. यामध्ये फक्त 1,000 रुपयांद्वारे गुंतवणूक सुरु करता येते. जर आपल्याला हवे असेल तर यामध्ये जॉईंट अकाउंट देखील उघडता येईल. यामधील सिंगल अकाउंटमध्ये 4.5 लाख रुपये तर जॉईंट अकाउंटमध्ये 9 लाख रुपये गुंतवता येतात. या खात्याद्वारे दर महिन्याला व्याज देखील मिळते. Investment Tips
पैसे कसे काढायचे???
या योजनेमधून 1 वर्ष ते 3 वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर डिपॉझिटमधील रकमेच्या 2 टक्के वजा करून पैसे परत केले जातील. तसेच जर 3 वर्षानंतर कधीही पैसे काढले तर डिपॉझिट्समधील रकमेच्या 1 टक्के वजा करून पैसे परत केले जातील. Investment Tips
किती पैसे गुंतवता येतील ???
जर मुलाच्या नावाने हे खाते उघडून 2 लाख रुपये गुंतवले तर 6.6% व्याजदराने दरमहा 1100 रुपये मिळतील. तसेच पाच वर्षांच्या कालावधीनंतर हे व्याज मिळेल. ज्याचे एकूण 66 हजार रुपये होतील. या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन गुंतवणूक सुरू करता येईल. Investment Tips
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
Business Idea : वर्षभर मागणी असणाऱ्या ‘या’ वस्तूच्या व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न !!!
Flipkart Sale मध्ये या गॅजेट्सवर ग्राहकांना मिळत आहेत जबरदस्त ऑफर्स, त्याविषयी जाणून घ्या
Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त मिस कॉल अन् मेसेज द्वारे अशा प्रकारे मिळेल कृषी लोन
LIC Housing Finance कडून कर्ज घेणे महागणार, होम लोनवरील व्याजदरात झाली वाढ
Aadhar Card 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे ??? अशा प्रकारे करा अपडेट