नवी दिल्ली । अदानी ग्रुपचे शेअर्स आज म्हणजेच 15 जून रोजी पुनरागमन करत आहेत. तथापि, त्याच्या शेअर्समध्ये अजूनही घसरण सुरु आहे. याआधी एक दिवस म्हणजेच 14 जून रोजी अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली. यापूर्वी असे नोंदवले गेले होते की, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने (NSDL) तीन फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स फंड (FPI) चे डिमॅट खाते ब्लॉक केले आहेत. या तीन FPI चे अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये 43,500 कोटींपेक्षा जास्त शेअर्स आहेत. मात्र, सोमवारी संध्याकाळी NSDL ने स्पष्ट केले की,”FPI ची डिमॅट खाती ब्लॉक केलेली नाहीत.”
गुंतवणूकदारांना आजही दिलासा मिळालेला नाही
सोमवारी अकाउंट फ्रीझ झाल्याची बातमी समजताच अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण झाली आहे. पण मंगळवारी शेअर्सचा कल संमिश्र राहिला. अदानी पोर्टचे शेअर्स निम्म्या टक्क्यांनी घसरत होते. तर अदानी पॉवरचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरत होते तर अदानी एंटरप्राइझचे शेअर्स 2 टक्क्यांनी वधारले आहेत.
अदानीच्या शेअर्सची आजची वाटचाल
<< अदानी एन्टरप्राइज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1496.85 रुपयांवर ट्रेड करीत आहे. ते सध्या 0.29 टक्के खाली आहे.
<< अदानी पॉवरचे शेअर्स 4.97 टक्क्यांनी खाली आला आहे. सध्या ते 133 वर ट्रेड करीत आहे.
<< अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स 5 टक्क्यांच्या घसरणीसह 1441.40 वर ट्रेड करीत आहे.
<< अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 0.08% च्या घसरणीसह 1175.00 वर ट्रेड करीत आहे.
<< अदानी टोटल गॅसचे शेअर्स 1467.35 वर ट्रेड करीत आहे. यात 5.00% ची घसरण झाली आहे.
<< अदानी पोर्ट्स – अदानी पोर्टचे शेअर्स 0.72% घसरणीसह 763.15 वर ट्रेड करीत आहे.
टीप- ही आकडेवारी BSE सकाळी 10.37 वाजताच्या ट्रेडिंग नुसार आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा