मुंबई । युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात IPL 2020 स्पर्धा खेळवली जाणार आहे. आयपीएलच्या १३वा हंगामासाठी युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आलेली नाही आहेत. कोरोनाची लागण झालेले चेन्नईच्या संघातील सर्व सदस्यांची तब्येत स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आयसोलेशन कक्षात हलवलं आहे. इंडिया टुटेने ही बातमी दिली आहे. दरम्यान, कोरोना काळात मोठ्या प्रयत्नांनी आयपीएलचा १३वा हंगामाचे आयोजन करणाऱ्या बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे.
बीसीसीआयने युएईत दाखल झाल्यानंतर सर्व संघांना मार्गदर्शक तत्व आखून दिली होती. चेन्नईचा संघही या सर्व नियमांचं पालन करत होता. दुबईत दाखल होताच क्षणी आधी सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. मात्र संघातील सपोर्ट स्टाफमधले १२ सदस्य आणि एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यानंतर चेन्नईच्या संघाने क्वारंटाइन कालावधी आठवडाभरासाठी वाढवला आहे.
दुबईत दाखल झालेल्या चेन्नईच्या खेळाडूंनी नियमाप्रमाणे आपला ६ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. परंतू संघातील सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे चेन्नईच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केलेली नाही. राजस्थान, पंजाब यासारख्या संघांनी आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.