…म्हणून विराट कोहली IPLसाठी टीम RCB सोबत न जाता प्रायवेट जेटने पोहोचला दुबईला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर IPLचा 13 वा सीजन भारतात होणार नसून यूएईला होणार आहे. त्यामुळं IPL 2020 स्पर्धेतील सर्व टीम हळूहळू यूएईमध्ये दाखल होत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची (RCB) संपूर्ण टीम शुक्रवारी यूएईमध्ये दाखल झाली. RCBने टीमचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मात्र यामध्ये कर्णधार विराट कोहली गायब आहे.

दरम्यान, विराट कोहलीला यूएईला जाणाऱ्या विमानात RCB टीम सोबत न दिसल्याने चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आरसीबीने आणखी एक फोटो शेअर केला त्यावेळी विराट दिसत आहे. विराट कोहली टीमसोबत यूएईला न जाता प्रायवेट जेटने दुबईला पोहोचला. त्याचं कारणही विराटने सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा भरवताना बीसीसीआयने नियामावली जारी केली आहे. या नियमानुसार खेळाडूंना सहा दिवस क्वॉरंटाईन व्हावं लागणार आहे. यूएईला पोहोचण्यासाठी आरसीबीचे खेळाडू बंगळुरु येथे सरावासाठी पोहोचले होते. तेथे सर्वांना विविध ठिकाणी ठेवण्यात आलं. मात्र, विराट बंगळुरु येथे टीममध्ये सहभागी न होता मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला आणि स्वत:ला मुंबई क्वॉरंटाईन केलं.

त्यानंतर विराट प्रायव्हेट प्लेनने दुबईला रवाना झाला. दुबईसाठी उड्डाण भरण्याआधी विराटने मुंबईत स्वत:ची कोरोना टेस्टही केली. येत्या 19 सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेला यूएईमध्ये सुरुवात होत आहे. यासाठी कोलकाता नाइट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्सचे संघ दुबईत पोहोचले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment