राज्य सरकारने ‘त्या’ प्रकरणात आधीच शहाणपणा दाखवायला हवा होता- राधाकृष्ण विखे पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर । माजी मंत्री व भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता. पण सरकारने जनतेचे लक्ष विचलित करून सत्य दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्यावर गणेशाची स्थापना केल्यानंतर विखे पाटील माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने सुरू केला आहे. यातून सत्य निश्चितच समोर येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही राज्य सरकावर टीका केली. शेतकरी दूध उत्पादकांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. राज्यात अतिवृष्टी झाली. शेतकरी पुन्हा संकटात सापडला असला तरी सरकारची कोणतीही मदत नाही. दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलन करतात, पण सरकार जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे विखे पाटील म्हणाले.

मंत्र्यांचेच दूध संघ असल्याने त्यांनीच सरकारचे अनुदान दडपण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही. ग्राहकांना विक्री केल्या जाणाऱ्या दुधाचे दरही कमी झाले नाहीत. याशिवाय कोरोना संकटातही राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही. कवडीमोल भावाने शेतीमाल विकावा लागला किंवा फेकून द्यावा लागला. सरकार नावाची व्यवस्था कोणत्याच संकटात शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसाला मदत करू शकलेली नसल्याचेही विखे पाटील यावेळी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment