सूर्यकुमारला रिलिज करणे केकेआरची मोठी चूक ‘या’ माजी कर्णधाराची टीका

Suryakumar Yadav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गौतम गंभीर कोलकाता संघाचा कर्णधार असताना सूर्यकुमार यादव हा कोलकाता संघाचा उपकर्णधार होता. केकेआरने २०१८ मध्ये सूर्यकुमार यादवला रिलिज केले. आताच्या घडीला सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. गौतम गंभीरने सूर्यकुमारला यादवला रिलिज करणे हि केकेआरची १२ वर्षांतील सर्वात मोठी चूक आहे असे सांगितले आहे. गंभीर आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. यंदाच्या आयपीएलमध्ये केकेआरला चार पराभवाला सामोरे जावे लागले.

काय म्हणाला गौतम गंभीर
सूर्यकुमार यादवने २०१२ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यावर्षी त्याला एकमेव सामना खेळण्याची संधी मिळाली होती. २०१४ ला तो केकेआरमध्ये आला. केकेआरकडून चार वर्ष खेळविल्यानंतर त्याला रिलिज करण्यात आले. २०१८ ला मुंबई इंडियन्सने ३.२ कोटी रुपयामध्ये त्याला आपल्या संघात घेतले. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. मुंबईच्या विजयात त्याने अनेकदा मोलाची भूमिका बजावली आहे.

ईयोन मॉर्गनच्या नेतृत्वात केकेआरने यंदा १ सामना जिंकला आहे तर ४ सामने गमावले आहेत. ‘जर भारतीय कर्णधार असता, तर लोकांनी त्याच्यावर टीका केली असती.’ असे विधान गौतम गंभीरने केले आहे. ते विधान दिनेश कार्तिकशी संबंधित होते. कार्तिकने २०२० मध्ये केकेआरच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. कार्तिकने दडपणामुळे कर्णधारपद सोडले अशी चर्चा रंगली होती.