IPL 2023 सामन्यांचे थेट प्रसारण कुठे अन् कसे पाहणार? चला जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचा कुंभमेळा असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 16 व्या हंगामाला 31 मार्च पासून सुरुवात होत आहे. भारतीय क्रिकेटप्रेमी दरवर्षी आयपीएलची वाट उत्सुकतेने पाहत असतात. यंदाच्या आयपीएल मध्ये पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने असतील. हा सामना कुठे आणि कसा पाहायचं असा प्रश्न निश्चितच तुमच्या मनात असेल. आज आम्ही तुम्हाला याबाबत संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत.

TV वर IPL 2023 चे सामने कसे पहाल ?

IPL 2023 मधील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण मागील हंगामाप्रमाणे यंदाही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. स्टार स्पोर्ट आपल्या प्रेक्षकांना HD आणि SD टेलिकास्टमध्ये सामन्याचे थेट प्रक्षेपण करेल. तसेच हे सर्व सामने तुम्हाला इंग्रजी, हिंदी आणि वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये पाहायला मिळतील.

IPL 2023 चे सामने ऑनलाइन कसे पाहू शकता ?

तुम्हाला जर मोबाईल वरून IPL 2023 चे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहायचं असेल तर तुम्हाला मोबाईल मध्ये Jio Cinema हे अँप डाउनलोड करावं लागेल. Jio Cinema अॅपवर तुम्ही अगदी फ्री मध्ये IPL चे सामने पाहू शकाल. Jio ने जाहीर केले आहे की हे सामने 4k रिझोल्युशनमध्ये पाहता येतील. तसेच देशभरातील जवळपास १२ भाषांमध्ये या सामन्यांचे प्रसारण होणार आहे. Jio Cinema च्या माध्यमातून तुम्हांला मोबाईल, टॅबलेट आणि लॅपटॉपवर IPL
सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे.

सामन्याची वेळ काय असेल?

यंदाच्या IPL 2023 चे लीग सामने दुपारी 3.30 आणि संध्याकाळी 7.30 या वेळेत खेळवले जातील. तसेच प्लेऑफचे सर्व सामने संध्याकाळी 7.30 पासून सुरू होतील.