IPL 2024 मधील 2 सामन्यांच्या तारखा अचानकपणे बदलल्या; समोर आलं मोठं कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धा (IPL 2024) सुरु असून क्रिकेटप्रेमींमध्ये मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र आता आयपीएलच्या 2 सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. राजस्थान आणि कोलकाता, गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

खरं तर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना 17 एप्रिल रोजी ईडन गार्डन मैदानावर आयोजित करण्यात आला होता, मात्र आता या दोन संघांमधील हा सामना एक दिवस आधी म्हणजेच 16 एप्रिल रोजी होणार आहे. 16 एप्रिलला गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार होता, मात्र आता हा सामना एक दिवस नंतर म्हणजे 17 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. रिपोर्ट्सनुसार, 17 एप्रिल रोजी देशभरात रामनवमी उत्साहात साजरी केली जाणार आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत सुरक्षा पुरवणं शक्य होणार नाही म्हणून सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएलच्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक (IPL 2024 Schedule) दोन टप्प्यात जाहीर केले होते. सुरुवातीला बीसीसीआयने आयपीएलच्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आणि लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित ५३ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. यंदाच्या आयपीएलचा १ क्वालिफायर आणि १ एलिमिनेटर सामना सामने अहमदाबाद येथे खेळवण्यात असून दुसरा क्वालिफायर आणि अंतिम सामना चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आला आहे.