हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स कडून खेळताना दमदार कामगिरी करणाऱ्या मराठमोळ्या पुणेकर ऋतुराज गायकवाड यांचं घरी परतल्यावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. ऋतुराजने फक्त दमदार कामगिरीच केली नाही तर यंदाच्या आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅपचा मानकरीही ठरला. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवणारा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू म्हणूनही त्याच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे.
यंदाच्या आयपीएल मध्ये ऋतुराज गायकवाड याने प्रत्येक सामन्यात चेन्नईला धडाकेबाज सुरुवात करून दिली. आयपीएलमध्ये खेळल्या गेल्या १६ सामन्यात त्याने ६३५ धावा केल्या आहेत. या खेळीत १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने एकूण ६४ चौकार आणि २३ षटकार ठोकले आहेत. कोलकाता विरुद्धच्या अंतिम सामन्यात देखील त्याने 26 चेंडूत 32 धावा केल्या होत्या.
Ruturaj Gaikwad Receives Grand Welcome @Ruutu1331 @ChennaiIPL 💛🦁 https://t.co/X651FGhopW
— 🎰 (@StanMSD) October 17, 2021
दरम्यान, आयपीएल संपवून ऋतुराज गायकवाड आज भारतात परतलाय. यावेळी त्याचे पिंपरी चिंचवडकरांनी फटाक्यांच्या आतषबाजीत सकाळी दमदार स्वागत केले. ऋतुराज घरी आज परत येणार असल्याची माहिती नसल्याने व्यायाम आणि फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनीही ऋतुराज दिसताच त्याला शुभेच्छा दिल्या