मी लहानच नेता, पण…; पवारांच्या टीकेला पंकजा मुंडेंचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पत्रकारांशी संवाद साधला साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंकजा मुंडे यांच्या बद्दल विचारलं असता त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करण्या एवढ्या त्या मोठ्या नेत्या नाहीत असं पवारांनी म्हटलं होतं. यावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. होय मी लहानच आहे पण लहानांना शिकवण हे मोठ्यांचे काम आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हंटल.

‘मी पवार साहेबांचं वक्तव्य ऐकलं नाही पण मोबाईलवर पाहिलं. त्यांनी जे बोललं ते खरं आहे. मी मोठा नेता नाही. मी लहानच आहे. पण मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोललं पाहिजे. त्यांना शिकवलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण तरीही त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर त्यामुळे मी लहानही होत नाही आणि मोठीही होत नाही. मी आहे तेवढीच राहणार. ते आमच्या पेक्षा मोठे नेते आहेत. यात काही वादच नाही’ असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण-

शरद पवार काल पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांना पंकजा मुंडे यांच्या बाबत प्रश्न विचारण्यात आला होता. भाजप सांगतं की महाविकास आघाडी सरकार पडेल. पण पंकजा मुंडे यांनी हे राजकारण बंद करा आणि आपण विरोधकांची भूमिका सक्षमपणे राबवावी असं भाष्य केलं. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, ‘मला यावर भाष्य करायचं नाही. त्या काही एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत की त्यांनी काही सल्ला दिला त्याबद्दल मी काय सांगायचं. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचं धोरण कसं असावं याबद्दल त्यांनी सांगितलं असेल. त्यावर मला भाष्य करायचं कारण नाही’.

You might also like